
असे म्हणतात की जोड्या या स्वर्गात बनतात, पृथ्वीवर तर लोक फक्त एकमेकांना भेटतात. ब्रिटनच्या जेम्स आणि क्लोची (James and Chloe Lusted) कहाणीदेखील अशीच आहे. या दोघांची जोडी इतकी हटके आहे की सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. जेम्स आणि क्लो या पती-पत्नीच्या उंचीमध्ये बराच फरक आहे, असे असूनही या दोघांची मने जुळली आहेत. साहजिकच या दोघांमधील प्रेमाने त्यांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. इतकेच नाही तर, आता त्यांच्या उंचीतील असलेल्या फरकामुळे या पती-पत्नीच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 33 वर्षीय अभिनेता जेम्स लस्टेड आणि 27 वर्षीय शिक्षिका क्लो लुस्टने 2016 साली लग्न केले. दोघेही यूकेमधील रहिवासी आहेत. याच वर्षी 2 जून रोजी, त्यांनी विवाहित जोडप्यामधील उंचीच्या फरकाबाबत विक्रम मोडला. जेम्सची उंची 109.3 सेमी (3 फूट 7 इंच) आहे आणि त्याची पत्नी क्लोची उंची 166.1 सेमी (5 फूट 5.4 इंच) आहे. या जोडप्याच्या उंचीमध्ये अंदाजे 2 फूटाचे अनार आहे.
2012 साली एका स्थानिक पबमध्ये या दोघांची पहिली भेट घडली. या दोघांची ओळख त्यांच्या कॉमन मित्राने करून दिली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले व ते एकमेकांना वरचेवर भेटत राहिले. पुढे 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले. आता या जोडप्याला ऑलिव्हिया नावाची एक मुलगी आहे, ती सुमारे दोन वर्षांची आहे. याबाबत क्लो म्हणाली की, आधी ती नक्कीच उंच पुरूषांकडे आकर्षित होत असे, मात्र जेम्सला भेटल्यानंतर तिचे जगच बदलले. (हेही वाचा: जो बिडेन यांचा मुलगा Hunter Biden ने बोलावली रशियन कॉलगर्ल; पित्याच्या खात्यातून केले 18 लाखांचे पेमेंट- रिपोर्टमधून खुलासा)
अनुवांशिक डिसऑर्डरमुळे जेम्सची उंची वाढली नाही. त्याला डिस्ट्रॉफिक डिसप्लेसीया आहे. सुरुवातीला तो आपल्या भविष्याबाबत नेहमी चिंतेत असे. मात्र आता त्याला असे वाटते की, प्रत्येकासाठी कोणी ना कोणी असते.