इस्लामी गट (संग्रहित संपादित प्रतिमा)

Ban ISKCON or We Will Kill Devotees: शेख हसीना सत्तेतून गेल्यानंतर बांगलादेशमध्ये (Bangladesh) जातीय तणाव सातत्याने वाढत आहे. मूलतत्त्ववाद्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे आणि विशेषतः हिंदूंचे जगणे कठीण केले आहे. बांगलादेशातील नवीन अंतरिम सरकारही जातीय परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरत आहे. याचे नवे उदाहरण समोर आले आहे. चितगावस्थित इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना किंवा इस्कॉनवर (ISKCON) बंदी घालण्याची मागणी केली आहे. इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राधारमण दास यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, 'बांगलादेशी मुस्लिमांनी मोहम्मद युनूस यांना इस्कॉनवर बंदी घालण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ते इस्कॉनच्या भक्तांना पकडून त्यांची निर्घृण हत्या करू लागतील.’ लेटेस्टली मराठीने स्वतंत्रपणे व्हिडिओची सत्यता पडताळली नाही.

इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने शुक्रवारी रॅली काढली. संघटनेने रॅलीत हिंसक घोषणाबाजी करत बांगलादेशच्या अंतरिम सरकारला इशारा दिला. इस्कॉनचा हिंदूंविरोधात भडकाऊ वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासह तस्लिमा नसरीन यांनी आपल्या पोस्टमध्ये इस्कॉन सदस्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिले, ‘चितगावस्थित हेफाजत-ए-इस्लाम या संघटनेने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आज त्यांचा नारा होता: ‘एक इस्कॉन पकडा, मग कत्तल करा.’ हेफाजत-ए-इस्लामने दहशतवाद पुकारला आहे. त्यांना इस्कॉन सदस्यांना मारायचे आहे. इस्कॉन ही काय दहशतवादी संघटना आहे की तिच्यावर बंदी घालावी?’

ने मुहम्मद युनूस सरकारला अल्टिमेटम दिला-

त्या पुढे म्हणतात, ‘इस्कॉन सदस्यांनी ‘हरे कृष्ण, हरे राम’ असा मोठ्याने जयघोष करताना कधी कोणाला मारले आहे का? दुसरीकडे, इस्लामिक दहशतवादी हे लोकांना मारताना ‘अल्लाहू अकबर’ असा जयघोष करतात. इस्कॉन जगभरातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि कोठेही अशा समस्यांना तोंड देत नाही, परंतु बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध कारस्थान सुरु आहे. असे का? कारण या देशात इस्लामवादी आणि जिहादी मोठ्या संख्येने आहेत जे इतर धर्माच्या लोकांना सहन करू शकत नाहीत. ते गैर-मुस्लिमांना इजा करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या भूमीतून हाकलण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या आणि डावपेच वापरत आहेत.’ (हेही वाचा: Israel-Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 14 पॅलेस्टिनी ठार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती)

दरम्यान, बांगलादेशातील इस्कॉनशी संबंधित वादाची सुरुवात 5 नोव्हेंबर रोजी एका स्थानिक व्यावसायिकाच्या फेसबुक पोस्टने झाली. त्याने इस्कॉनला दहशतवादी संघटना म्हणून संबोधले होते. फेसबुक पोस्टमुळे चट्टोग्राममधील हजारी गली भागातील हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोस्ट लिहिणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर लोकांनी निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर 100 संशयितांना अटक करण्यात आली.