Anita Anand with Justin Trudeau | Instagram @Anita Anand

Justin Trudeau यांनी कॅनडा च्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता कॅनडाचे नवे पंतप्रधान कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवीन नेता निवडीसाठी 24 मार्च पर्यंत मुदत आहे. त्यामुळे आता नव्या पंतप्रधान पदासाठी शर्यत सुरू झाली आहे. लिबरल पक्ष नवीन नेता निवडेपर्यंत देशाची संसदेचं काम बंद राहणार आहे. दरम्यान पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये Pierre Poilievre, Chrystia Freeland, Mark Carney,यांच्यासह एक भारतीय देखील आहे. Anita Anand यांच्या नावाची देखील सध्या चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रभावी प्रशासन आणि सार्वजनिक सेवा पार्श्वभूमीसह, 57 वर्षीय वकील असलेल्या अनिता आनंद 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केल्यापासून लिबरल पक्षाच्या सर्वात महत्वाकांक्षी सदस्यांपैकी एक राहिल्या आहेत.

BBC च्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय वंशाच्या अनिता आनंद या टॉप 5 उमेदवारांपैकी एक आहेत. पुढील नेता निवडीपर्यंत आता Trudeau हेच कॅनडाचे पंतप्रधान राहणार आहेत. पण त्यांच्यानंतर कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. नक्की वाचा: Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार .

कोण आहेत अनिता आनंद?

अनिता आनंद या कॅनडामध्ये वकील आणि राजकारणी आहेत. सध्या Minister of Transport and Internal Trade म्हणून कार्यरत आहेत. 57 वर्षीय अनिता माजी संरक्षण मंत्री 2019 मध्ये पहिल्यांदा राजकारणात उतरल्यापासून पक्षातील प्रमुख व्यक्तींपैकी एक राहिल्या आहेत. त्या  टोरंटोच्या उपनगरातील Oakvilleचे प्रतिनिधित्व करत आहेत.

अनिता यांचे शिक्षण, Queen's University मधून झाले आहे. त्यांनी Bachelor of Arts in Political Studies ची पदवी घेतली आहे. Oxford University मधून Jurisprudence मध्ये त्यांनी Bachelor of Arts ची पदवी घेतली आहे. तर डलहौसी युनिव्हर्सिटीमधून कायद्याची बॅचलर आणि टोरंटो युनिव्हर्सिटीमधून कायद्याचे मास्टर शिक्षण पूर्ण केले आहे.

अनिता आनंदचा जन्म Nova Scotia मधील Kentville येथे झाला. त्यांची आई सरोज डी. राम आणि वडील एस.व्ही. (अँडी) आनंद हे दोघेही भारतीय physicians आहेत. त्यांना गीता आणि सोनिया आनंद या दोन बहिणी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita Anand (@anitaanandmp)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नऊ वर्षांच्या कार्यकाळानंतर नेतृत्व बदलासाठी त्यांच्या पक्षातून दबाव वाढल्यानंतर देशाचे प्रमुख आणि सत्ताधारी लिबरल पक्षाचे नेते म्हणून राजीनामा दिला आहे. त्यांनी कालच स्वतः याबद्दल माहिती देत या नेतृत्त्व बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचं जाहीर केले आहे.