Cheistha Kochar (PC - X/@amitabhk87)

Indian Student Dies in London: लंडनमध्ये भारतीय विद्यार्थिनीचा ट्रकने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics) मधून पीएचडी करत असलेल्या 33 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीला सायकलवरून जात असताना ट्रकने धडक दिली, परिणामी तिचा जागीच मृत्यू झाला. चिस्ता कोचर (Cheistha Kochar) असे मृत मुलीचे नाव आहे. चिस्ता कोचर यांनी यापूर्वी NITI आयोगात काम केले होते. त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी करत होत्या.

स्थानिक वृत्तानुसार, ही घटना 19 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडली. अपघातानंतर, फरिंग्डन आणि क्लर्कनवेल दरम्यान पोलिस आणि पॅरामेडिक्सला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अपघातात चिस्ता कोचर गंभीर जखमी झाल्या होत्या. (हेही वाचा - Indian Dies In USA: अमेरिकेत Pennsylvania मध्ये भारतीय तरूणीचा कार अपघातामध्ये मृत्यू)

मेट्रोपॉलिटन पोलिसांचा हवाला देऊन, लंडन इव्हिनिंग स्टँडर्डने सांगितले की, आपत्कालीन सेवां देण्याचा प्रयत्न करूनही 33 वर्षीय चिस्ता यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पोलिस प्रवक्त्याचा हवाला देऊन अहवालात म्हटले आहे की ट्रकचा चालक घटनास्थळी थांबला.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या अपघातातील साक्षीदारांनी समोर यावे किंवा ज्यांच्याकडे या घटनेचे फुटेज असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. चीस्ता कोचर या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) चे महासंचालक सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ एसपी कोचर यांच्या कन्या होत्या.