Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला (Jammu Kashmir Terrorist Attack) केल्याची ताजी घटना समोर आली आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. दुखापतग्रस्त पर्यटक हे राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)