Alejandra Rodríguez PC TWITTER

Miss Universe Buenos Aires Crown: कोणत्याही क्षेत्रात वयाचं बंधन असतं, पण यावर मात करत अलौकिक कामगिरि करत अलेजांड्रा रॉड्रिग्ज या वयाच्या 60 व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा' (Miss Universe Buenos Aires) खिताब जिंकली. अलेजांड्रा या पेशाने वकिल आणि पत्रकार आहे. सौदर्यांला आणि वयाला बंधन नसतं याचा उदाहरण म्हणून त्यांनी आज सगळ्याचे मन जिंकली आहेत. इतिहासात पहिल्यांदा वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला आहे. त्या सर्वात जुन्या मिस युनिव्हर्स स्पर्धक आहे. अलेजांड्रा या अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्सची राजधानी असलेल्या प्लाटा येथील रहिवासी आहे. (हेही वाचा- The Family Star मधील 'त्या' डायलॉगमुळे Vijay Deverakonda होतोय ट्रोल)

वयाच्या 60 व्या वर्षी खिताब जिंकून वय आणि सौदर्यांच्या कल्पनांना तोडून अलेजांड्रा लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. X वर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अलेजांड्रा ब्यूनस आयर्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे असं म्हटलं आहे.  मे 2024 मध्ये नियोजित मिस युनिव्हर्स अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय निवडीमध्ये. यशस्वी झाल्यास, ती 28 सप्टेंबर 2024 रोजी मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज होईल.

माध्यमांंशी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक संकटाना झुंगारून, मात करून यांनी हा खिताब जिंकला. हा ऐतिहासिक क्षण बनवण्यासाठी  फार मेहनत घ्यावी लागली आहे. त्यांचे तेजस्वी स्मित हास्य आणि आकर्षक वर्तनांनी प्रेक्षकांच्या मनावर कब्जा केला आहे.