The Family Star : विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा रोमँटिक, कौटुंबिक चित्रपट द फॅमिली स्टार (The Family Star) नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट मध्यमवर्गीय कुटुंबातील जीवन आणि नातेसंबंधांवर आधारीत आहे. विजय देवरकोंडा यात वीर नावाचे पात्र निभवत आहे. मात्र, त्या दरम्यान तो बलात्काराची धमकी (Rape Dialogue) देताना दिसत आहे. चित्रपटातील या दृश्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले आहे. त्यांनी चित्रपटातील त्या सीनची व्हिडीओ (Video)व्लिप सोशल मिडीयावर शेअर केली आहे. "लक्षात ठेवा, आमच्या कुटुंबात पुरुष देखील आहेत आणि तुमच्याकडे महिला आहेत." या डायलॉगमुळे विजय देवरकोंडाला ट्रोल करण्यात येत आहे. (हेही वाचा :Anita Hassanandani Announces Pregnancy: 'नागिन' अभिनेत्री अनिता हसनंदानीने केली प्रेग्नेंसीची घोषणा, पाहा क्यूट व्हिडिओ )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)