Violence Against Women In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ; संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली चिंता
Women In Afghanistan (PC - Twitter/@UN_Women)

Violence Against Women In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांनीही महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच गुटेरेस यांनी महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी महिलांवरील हिंसाचार हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आणि शाश्वत विकासातील एक मोठा अडथळा असल्याचे वर्णन केले. 25 नोव्हेंबर हा महिला अत्याचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा -Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांचा युद्धविराम; गाझामधील मृतांची संख्या 14,800 हून अधिक)

तफसीर सियाहपोश या महिला हक्क कार्यकर्त्याने सांगितले की, मुलींवर सर्वात मोठा हिंसाचार म्हणजे त्यांना शाळा आणि विद्यापीठांमध्ये न पाठवणे. महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर दबाव आणला जातो. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा काही सरकार या महिलांची काळजी घेईल.

काही अफगाण महिलांच्या म्हणण्यानुसार, तालिबानने लादलेल्या निर्बंधांमुळे देशातील महिलांसमोरील आव्हाने वाढली आहेत.