Gun Shot | Pixabay.com

Indian Student Shot Dead in Canada: कॅनडातून (Canada) अत्यंत दु:खद बातमी येत आहे. कॅनडातील एडमंटनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. पंजाब राज्यातील हर्षनदीप सिंग (Harshandeep Singh) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. हर्षदीप हा पंजाब राज्यातील रहिवाशी होता. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदीप ज्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते, त्या अपार्टमेंटच्या बाहेर काही लोकांमध्ये हाणामारी झाली.

काही लोक अपार्टमेंटमध्ये घुसले त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. प्राथमिक तपासात दोन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर हर्षदीपला पायऱ्यांवरून खाली फेकताना दिसत आहेत. वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी, 6 डिसेंबर रोजी सकाळी 12:30 वाजता घडली. पोलिसांनी जखमी हर्षदीप सिंगवर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Indian Student Died in US: नवीन बंदूक साफ करतांना लागली गोळी, तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू)

दरम्यान, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, शुक्रवारी कॅनडातील एडमंटन येथील एका अपार्टमेंटमध्ये 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. हर्षदीप सिंगच्या हत्येप्रकरणी इव्हान रेन आणि 12 वर्षांच्या जुडिथ सोल्टो या दोन आरोपींना अटक केली आहे. (हेही वाचा - Indian Student Shot Dead In Canada: कॅनडामध्ये 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अपार्टमेंट इमारतीत गोळीबार झाल्याचा वृत्त मिळाल्यानंतर त्यांनी 107 व्या एव्हेन्यू परिसरात धाव घेतली. यावेळी त्यांना हर्षदीप सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कथित घटना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. तीन जणांच्या टोळीतील एक हल्लेखोर हर्षदीप सिंगला पायऱ्यांवरून खाली फेकताना आणि मागून गोळ्या झाडताना दिसत आहे.