पाकिस्तानातील (Pakistan) कराची-रावळपिंडी तेजगाम एक्सप्रेसला (Karachi-Rawalpindi Tezgam Express) भीषण आग लागली असून आत्तापर्यंत 65 प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे कळत आहे. तर दुसरीकडे अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेची खबर मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोचून बचाव कार्याचा आरंभ केला आहे. अजूनही ही आग पकडण्यामागचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार कराची-रावळपिंडी तेजगाम एक्सप्रेस रहीम यार खान रेल्वे स्टेशनच्या जवळ लियाकतपूर पर्यंत पोहचली होती. इतक्यात ट्रेनच्या एका डब्याला आग लागली. नंतर ती आग इतक्या वेगात पसरू लागली की प्रवाश्यांना आकलन होऊन पळणेही अशक्य झाले. आणि हे सगळं सूर्योदयापूर्वी झाल्या कारणाने ट्रेनमधील प्रवासी पेंगुळलेल्या अवस्थेत होते. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी सर्वप्रथम प्रवाश्यांना बाहेर काढले आणि प्रकृती चिंताजनक असलेल्या प्रवाश्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
#UPDATE Death toll rises to 65, in incident where fire broke out in Karachi-Rawalpindi Tezgam express train in Liaqatpur near Rahim Yar Khan, earlier today: Geo News #Pakistan pic.twitter.com/CeMEexjUj6
— ANI (@ANI) October 31, 2019
एकीकडे अजूनही बऱ्याच प्रवाश्यांची तब्येत नाजूक अवस्थेत असताना दुसरीकडे ही मृतांची आणि जखमींची संख्या वाढत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.