अनेक बॉलीवूड स्टार्सचे प्रतिनिधित्व करणारे फौजदारी वकील शिवडे यांनी हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेता सलमान खानची बाजू मांडली होती. श्रीकांत शिवडे यांनी चित्रपट निर्माते भरत शहा आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे वकील म्हणूनही काम केले होते.