कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक सर्वपक्षीय बैठक काही महिन्यांपूर्वी आयोजित केली होती. या बैठकीवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. आता पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हे दोघे एका व्यासपीठावर दिसणार आहेत.