शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांनी केतकीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर केतकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती.