Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
डिलिव्हरी बॉय ने हे देखील स्पष्ट केले आहे की या व्हिडिओमधील महिला-पुरूष हे जोडपे नाहीत. ते आई आणि मुलगा आहेत. डिलिव्हरी बॉयने तो मराठी शिकेल आणि बोलेलही असे म्हटलं आहे.
मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी Domino च्या डिलेव्हरी बॉय चा मराठी भाषिक जोडप्यासोबत 'मराठी बोलण्यावरून' वाद झाल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. या जोडप्याने मराठीत बोलता येत नाही मग पैसेच देणार नसल्याचं म्हटलं होतं. Rohit Lavare या घटनेचा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर आता या डिलेव्हरी बॉय ने माफी मागितली आहे.
मुंबईच्या भांडूप भागातील ही घटना 12 मे दिवशीची आहे. साई राधे बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला आहे. अनेकांनी या डिलेव्हरी बॉयची बाजू उचलून धरली होती. अखेर हा प्रकार मनसेच्या कार्यालयापर्यंत पोहचला. एका नवीन व्हिडिओमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय मराठी लादण्याच्या कथेचा "चुकीचा प्रसार" केल्याबद्दल माफी मागत असल्याचे दिसत आहे.
डिलेव्हरी बॉयची माफी आणि खुलासा
Domino’s Delivery Boy - “मॅडम बोहत अच्छी है, उन्होंने पैसे भी दिये थे. मे मॅडम की माफी मांगता हू. अब मे मराठी बोलुंगा भी और सीखुंगा भी. जय हिंद, जय महाराष्ट्र.”
That’s what you get when you don’t respect our culture and language! Kudos to @mnsadhikrut 🔥
महाराष्ट्रात मराठीच! pic.twitter.com/BE22XjnAwJ
— Akshay Joshi (@AkshayJoshi_11) May 14, 2025
"मी हे जाणूनबुजून केले नाही. मी ते डोमिनोज ग्रुपला पाठवले आणि ते व्हायरल झाले. मॅडमने पैसे दिले. आता गैरसमज नकोत. कृपया व्हिडिओ व्हायरल करा," असे तो म्हणतो आणि अनेक मोबाईल फोनवर त्याचे म्हणणे रेकॉर्ड होत आहे. त्याला कथित घटनेत सहभागी असलेल्या महिलेची माफी मागण्यास सांगण्यात आले आणि नंतर त्यानेही माफी मागितली आहे.
मुंबईत यापूर्वी एअरटेल गॅलरी मध्येही ग्राहकाशी मराठीत न बोलणार्या कर्मचार्याला मनसे ने धडा शिकवला आहे. मराठी ही महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आग्रह आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते मराठीचा अपमान होत असलेल्या ठिकाणी कठोर भुमिका घेत मराठीचा आग्रह धरून ठेवताना दिसत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2025 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

