YouTube Down: आधुनिक युगात मानव मोबाईल आणि ठरावीक काही ॲप्सशिवाय आयुष्य जगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. जेव्हा जेव्हा एखादे ॲप बंद होते तेव्हा लोकांमध्ये घबराट वाढते. अनेक वेळा इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि एक्स (X) डाऊन होते. त्यामुळे यूजर्संना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता काही YouTube वापरकर्त्यांना यूट्यूब ॲप, वेबसाइट आणि व्हिडिओ अपलोड करताना समस्या (YouTube Down) येत आहे. सोमवारी दुपारी 1.30 वाजल्यापासून DownDetector ॲपवर यूट्यूबसंदर्भात तक्रारी येत आहेत.
वेबसाइटनुसार, 43 टक्के वापरकर्त्यांना यूट्यूब वापरताना समस्या येत आहेत. या यूजर्संनी आपली समस्या नोंदवली आहे. 33 टक्के लोकांना व्हिडिओ अपलोड करताना तर 23 टक्के लोकांना YouTube वेबसाइटवर समस्या होत्या. मात्र, YouTube समर्थन पृष्ठ किंवा त्याच्या सोशल मीडिया चॅनेलवर यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. (हेही वाचा -Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन; शेअर बाजार, बँकिंगसह बंद झाल्या 'या' सेवा)
दरम्यान, YouTube वर काही वापरकर्ते त्यांच्या फीडवरील व्हिडिओंशी संबंधित समस्यांबद्दल ट्विट करत आहेत. अपलोड केलेले व्हिडिओ फीडमध्ये दिसत नाहीत असं यूजर्स म्हणत आहेत. सध्या X वर #YouTubeDown सारख्या हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. एक्सवर पोस्ट करत वापरकर्ते त्यांचे अनुभव शेअर करत असून समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Microsoft Windows Crash News: जगभरात अनेक युजर्सच्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वर ‘Your Device Ran Into a Problem’ चे मेसेजेस; अनेकांनी X वर शेअर केले स्क्रिनशॉर्ट्स)
thanks for flagging this! we're checking it out rn, we'll reach back out if we need any extra info!
— TeamYouTube (@TeamYouTube) July 22, 2024
YouTube चा प्रतिसाद
YouTube डाउन संदर्भाती अनेक पोस्ट्स आणि ट्रेंडिंग हॅशटॅग पाहिल्यानंतर कंपनीने अधिकृत @TeamYouTube (ट्विटर खाते) वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, 'हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! आम्ही ते तपासत आहोत, आम्हाला काही अतिरिक्त माहिती हवी असल्यास आम्ही पुन्हा संपर्क करू!'