आता गिफ्ट देऊ शकता ही 2 हजार पेक्षा कमी किमतीची हटके गॅजेट्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

सध्या फेस्टीव्ह सिझन चालू आहे. अशावेळी हमखास भेटवस्तूंची देवाणघेवाण होत असते. कपडे, मिठाई अशा गोष्टींना तर सगळ्यांचीच पसंती असते. मात्र याव्यतिरिक्त काही वेगळ्या आणि हटके गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या तर त्या नक्कीच युनिक ठरतील आणि समोरच्या व्यक्तीलाही थोडे स्पेशल फील होईल. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा काही गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत जी अगदी तुमच्या खिशाला परवडतील आणि आणि ज्यांना देणार आहात त्यांना उपयोगीही पडतील.

> Mi Band 3

शाओमीच्या या Fitness Band ची किंमत आहे फक्त 1,999 रुपये. या Bandमध्ये स्मार्ट फिटनेस ट्रॅकर सोबतच हार्ट रेट मॉनिटरसुद्धा देण्यात आला आहे. या Fitness Bandमध्ये OLED टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेद्वारे तुम्ही तुमचे सर्व नोटिफिकेशन्स पाहू शकता तसेच हवामानाचा अंदाजही घेऊन शकता.

> Mi Compact Bluetooth Speaker 2

या ब्ल्यूटूथ स्पिकरची किंमत फक्त 799 रुपये आहे. या स्पिकरची साउंड क्वालिटी अतिशय उत्तम असून, यामध्ये आवाजाची काहीही समस्या उद्भवणार नाही. या स्पिकरमध्ये मायक्रोफोनसुद्धा आहे, याच्या मदतीने तुम्ही लोकांचे फोनदेखील अटेंड करू शकता.  ज्या लोकांचे सतत फोनवर बोलण्याचे काम असते अशा लोकांसाठी हे अतिशय उत्तम गिफ्ट ठरू शकते.

> Mi Power Bank 2i

ही 20,000 एमएएच ची पावरबँक फक्त 1,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये क्वालकॉम क्विक चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. याचसोबत यामध्ये ड्युअल यूएसबी आउटपुटदेखील आहे. म्हणजे एकाचवेळी तुम्हे दोन गोष्टी चार्ज करू शकता. आजकालच्या स्मार्टफोनच्या युगात कोणालाही आवडेल असे हे गिफ्ट ठरू शकते.

> Boat Bluetooth Wireless Earphones

या वायरलेस इयरफोनची किंमत फक्त 1,499 रुपये इतकी आहे. यामध्ये ब्लूटूथ 4.1 आणि एचडी क्वालिटीचा साउंडदेखील समाविष्ट करण्यात आला आहे.  या इयरफोनमध्ये 6 तासांचा प्लेटाईम देण्यात आला आहे. वायरची कटकट नसल्याने हा इयरफोन तुम्ही हवा तसा, हवे तिथे वापरू शकता.

> Mi Pocket Speaker 2

शाओमीच्या या पॉकेट स्पिकरची किंमत 1,499 रुपये इतकी आहे. यामध्ये 5 वॅटचा साउंड स्पिकर देण्यात आला आहे. याच्या ब्लूटूथ स्पिकरची बॅटरी 1,200 एमएएच इतकी आहे. याचा बॅटरी बॅकअप जवळजवळ 7 तासांचा आहे.

> Mug Warmer

यूएसबी Mug Warmerच्या मदतीने आपण चहा किंवा कॉफी गरम करू शकता. होस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठी हे अतिशय उपयोगी गिफ्ट ठरू शकेल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे  हा मग आपण आपल्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोन चार्जरशी कनेक्ट करू शकता.

Mi VR Play 2

शाओमीच्या या व्हर्च्युअल रियालिटी हेडफोनची किंमत 1500 रुपयांपेक्षा कमी आहे. या हेडसेटच्या सहाय्याने आपण चित्रपट पाहू शकता किंवा गेमदेखील खेळू करू शकता.