Xiaomi Redmi Note 7 Pro चा फ्लॅश सेल आज दुपारी 12 पासून Flipkart, Mi.com वर सुरु; पहा काय आहेत ऑफर्स
Xiaomi Redmi Note 7 Pro (Photo Credits: File Photo)

शाओमी कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला. आता भारतात या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल आजपासून सुरु होत आहे. आज दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईट  Mi.com आणि Mi Home stores यावरुन खरेदी करता येईल. यापूर्वी आयोजित केलेल्या सेलमध्ये काही वेळातच सर्व फोन्सची विक्री झाली. त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा तुम्हाला फोन खरेदीची संधी उपलब्ध करुन देत आहेत. त्यामुळे आजची संधी अजिबात दवडू नका. सेल सुरु होण्यापूर्वीच सर्व डिटेल्स भरुन फोन खरेदीसाठी तयारीत रहा.

Redmi Note 7 Pro किंमत आणि ऑफर्स:

या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन नेप्ट्यून ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक या रंगात उपलब्ध आहेत. ऑफर्स नुसार या फोनसोबत जिओ युजर्सला डबल डेटा ऑफर दिला जाईल. यासाठी तुम्हाला 198 रुपये किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज करावा लागेल. तर एअरटेल युजर्सला 1120 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

Redmi Note 7 Pro चे फिचर्स:

यात तुम्हाला 6.3 इंचाचा फुल HD+ डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रेजोल्यूशन 2340×1080 आहे. हा फोन अॅनरॉईड पाय वर काम करतो. यात ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. यात प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल आणि सेकेंडरी सेंसर 5 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये Sony IMX 586 सेंसर वापरण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.