शाओमी (Xiaomi) या चायनीज स्मार्टफोन कंपनीने आपल्या काही फोन्सच्या किंमती भारतीय बाजारात वाढवल्या आहेत. रेडमी नोट 10टी (Redmi Note 10T), नोट 10एस (Note 10S), रेडमी 9 (Redmi 9), रेडमी 9 प्राईम (Redmi 9 Prime) आणि रेडमी 9 पावर (Redmi 9 Power) या मोबाईलच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर रेडमी 9आय (Redmi 9i) या स्मार्टफोनच्या किंमतीत 300 रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शाओमीने रेडमी नोट 10 च्या किंमतीत वाढ केली होती. त्यामागोमाग आता या इतर मोबाईल्समध्ये देखील किंमत वाढ करण्यात आली आहे.
कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या मोबाईलच्या वाढललेल्या किंमती तुम्हाला पाहता येतील. तसेच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील मोबाईलच्या वाढलेल्या किंमती तुम्हाला दिसतील. रेडमी 9 स्मार्टफोनचा 4 जीबी+64जीबी वेरिएंट 8999 रुपयांना तर 4जीबी+128जीबी वेरिएंट 9999 रुपयांना उपलब्ध होईल. रेडमी 9 पॉवर या स्मार्टफोनचा 4जीबी+64जीबी वेरिएंट 11,499 रुपयांना मिळेल. तर या स्मार्टफोनच्या इतर वेरिएंटच्या किंमतीत काही बदल झालेला नाही. (Xiaomi कडून 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च, अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार फोन)
रेडमी 9 प्राईम या स्मार्टफोनच्या 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 10,499 रुपये इतकी झाली आहे. तर 4जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी झाली आहे. तर रेडमी 9आय या स्मार्टफोनमध्ये 300 रुपयांची वाढ झाली असून या स्मार्टफोनचा 4जीबी+128जीबी वेरिएंट 9,999 रुपयांना मिळेल.
रेडमी नोट 10एस या स्मार्टफोनचा 6जीबी+128जीबी वेरिएंट 16,499 रुपयांना मिळेल. तर या स्मार्टफोनच्या 4जीबी+128जीबी वेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल दिसून येणार नाही. रेडमी नोट 10 5जी चा 4जीबी+64जीबी मॉडल आता 14,999 रुपयांना मिळेल. तर या स्मार्टफोनचा 6जीबी+128जीबी वेरिएंट 16,999 रुपयांना उपलब्ध होईल.