Xiaomi Redmi 7 चा फ्लॅश सेल आजपासून सुरु; जाणून घ्या काय आहे किंमत आणि फिचर्स
Redmi 7 (Photo Credits-Twitter)

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने काही दिवसांपूर्वी Redmi 7 हा हँडसेट भारतीय बाजारात लॉन्च केला. आता या फोनचा फ्लॅश सेल सुरु केला जात आहे. 13 मे दुपारी 12 वाजल्यापासून हा फ्लॅशसेल सुरु होईल. हा सेल ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे Amazon कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन हा फोन दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करु शकता. Amazon शिवाय अधिकृत वेबसाईट Mi.com आणि Mi Home Store यावरुन देखील तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. तुम्ही जर Redmi 7 हा स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असला तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

Xiaomi Redmi 7 ची किंमत:

या फोनचा 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपये किंमतीत खरेदी करता येईल. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांत खरेदी करता येईल. यात एक्लिप्स ब्लॅक, कॉमेट ब्लू आणि लूनर रेड हे रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. Reliance Jio च्या युजर्सला 2,400 रुपयांच्या कॅशबॅक समवेत 4 वर्षांपर्यंत डबल डेटा ऑफर देखील दिली जात आहे.

Xiaomi Redmi 7 चे फिचर्स:

यात 6.26 इंचाचा HD+ LCD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देखील दिले गेले आहे. या फोनमध्ये 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याची बॅटरी 17 दिवस स्टँड बाय आणि 2 दिवसांचे बॅटरी लाईफ देण्यासाठी सक्षम आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 8 मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा देखील यात आहे. यात फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. यात फुल HD रेकॉर्डींग 60fps वर करता येईल.