Xiaomi Mi CC9 Pro (Photo Credit: Twitter)

भारतात शाओमी (Xiaomi) कंपनीने सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. शाओमी कंपनी बाजारात आल्यापासून इतर स्मार्टफोन कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर, अॅपल, सोनी, सॅमसंग, नोकिया कंपनीच्या वापरकर्त्ये शाओमी कंपनीला पसंती दाखवत आहेच. यातच शाओमी कंपनीने त्यांच्या नवा धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करुन बाजारात धुमाकूळ घालत आहे. शाओमी कंपनीने त्यांचा सीसी 9 प्रो (Xiaomi Mi CC9 Pro) हा स्मार्टफोन लाॉन्च करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, बाजारातील इतर स्मार्टफोनच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक स्वस्त असून यात अधिक फिचर्सचा समावेश केला आहे.

शाओमीच्या स्मार्टफोनला गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच पसंती मिळत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शाओमी कंपनी त्यांच्या स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत बाजारात आणत असल्यामुळे याची अधिक विक्री होते. यातच शाओमी कंपनीने सीसी 9 नवा स्मार्टफोन बाजारात अधिक आर्कषित तरुण वर्गाला अधिक आवडेल, अशी अपेक्षा केली जात आहे. हे देखील वाचा- TikTok ची कंपनी ByteDance चे स्मार्टफोन विश्वात पाऊल; 4 कॅमेरे असलेला Nut Pro 3 सादर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये

शाओमी सीसी 9 प्रो स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स

शाओमी सीसी 9 प्रो स्मार्टफोनची (6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोअरेज) किंमत 28 हजार आहे. तसेच 8 जीबी रॅम आणि 263 स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 31 हजार 200 रुपये आहे. शाओमी सीसी 9 प्रोची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 108-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. शाओमी सीसी 9 प्रोमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे, तर त्याच्या मागे आणखी चार कॅमेरा सेन्सर आहेत. 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स, पोर्ट्रेट फोटोंसाठी 12-मेगापिक्सलचा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो शॉट्स आणि 20-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कोन सेन्सर समोर, शाओमी सीसी 9 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.