Smartisan Jianguo Pro 3 (संग्रहित संपादित प्रतिमा)

टिक टॉकची (TikTok) मुख्य कंपनी बाईटडान्सने (ByteDance) आपला स्मार्टफोन स्मार्टिसन जियांगु ओ प्रो 3 (Smartisan Jianguo Pro 3) लॉन्च केला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच कंपनी एक फोन लॉन्च  करणार असल्याची बातमी आली होती. चीनमध्ये लॉन्च झालेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 2,899 युआन (सुमारे 29,000 रुपये) आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर आहे. याशिवाय यात एक शॉर्टकट देण्यात आला आहे. यामध्ये सेल्फी लाइटनिंगसह अनेक नवीनतम सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. तसेच फोनची लॉक स्क्रीन सिंगल स्वाइप करुन वापरकर्ते थेट टिकटॅक अ‍ॅप वापरू शकणार आहेत.

Nut Pro 3 सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 2,899 युआन म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आहे, 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,199 युआन म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आहे. या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणारा प्रकारही आहे, ज्याची किंमत 3,599 युआन, म्हणजे सुमारे 36,000 रुपये आहे. अद्याप हा फोन भारतात लॉन्च झाल्याची कोणतीही माहिती नाही.

या फोनमध्ये स्मार्टिसन ओएस 7 (Smartisan OS 7) मिळेल. हा OS Android च्या कोणत्या आवृत्तीवर आधारित आहे याची माहित नाही. फोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, म्हणजेच यात चार कॅमेरे आहेत. मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, तर चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (हेही वाचा: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Moto G8 Plus लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

या फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी आहे, जी 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4 जी एलटीई, ब्लूटूथ व्ही 5.0, वाय-फाय, जीपीएस, वाय-फाय डायरेक्ट आणि टाइप-सी चार्जिंग आहे. कलर ऑप्शनविषयी बोलायचे झाले तर, हा फोन केवळ पांढर्‍या आणि काळा रंगात उपलब्ध आहे.