Xiaomi ने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 10C; किंमत आणि खास फिचर्स घ्या जाणून
Redmi 10C (PC - Twitter)

Redmi 10C स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या फोनचे डिटेल्स लीक होत होते. कंपनीने अखेर हा फोन लॉन्च केला आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात Redmi 10 नावाने लॉन्च केला जाईल. सध्या, ब्रँडने नायजेरियामध्ये हे उपकरण लॉन्च केले आहे. Xiaomi Nigeria ने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करून हा डिवाइस लाँच झाल्याची माहिती दिली आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे.

Redmi 10C किंमत -

कंपनीने हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोन 4GB आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 4GB RAM + 64GB स्टोरेजची किंमत N78,000 (अंदाजे रुपये 14,400) आहे, तर त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत N87,000 (अंदाजे रुपये 16 हजार) आहे. (वाचा - iPhone SE 2022: Apple ने भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त आयफोन; किंमत Rs 43,900 पासून सुरू, पहा कधी करू शकाल ऑर्डर)

Redmi 10C फिचर्स -

Redmi 10C स्मार्टफोनमध्ये 6.71-इंच स्क्रीन आहे, जी नॉच स्टाइल डिझाइनसह येते. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो. यात चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल डिझाइन आहे, ज्यामध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. हँडसेट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायासह येतो. रिपोर्ट्सनुसार Xiaomi हा फोन Redmi 10 च्या नावाने भारतात लॉन्च करू शकते.

दरम्यान, Redmi 10 पुढील आठवड्यात म्हणजेच 17 मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन 50MP कॅमेरा सह येईल. तथापि, कंपनीने Redmi 10C मधील सर्व वैशिष्ट्ये उघड केलेली नाहीत. हा फोन भारतात Redmi 10 म्हणून लॉन्च होईल की नाही याची पुष्टी ब्रँडने केलेली नाही.