Xiaomi Y3 Smartphone (Photo Credits: Twitter)

चीनी कंपनी शाओमीच्या (Xiaomi) स्मार्टफोनला भारतात अधिक पसंती दर्शवली जात आहे. यातच शाओमी कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन नोट 10 (Xiaomi Note 10) आणि नोट 10 प्रो (Xiaomi Note 10 Pro) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. शाओमी कंपनीच्या चाहत्यांना हे दोन्ही स्मार्टफोन येत्या नवीन वर्षात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये खास वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. शाओमी नोट 10 आणि नोट 10 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन अनेकांना पसंत येतील, अशी आशा कंपनी करत आहे. तसेच भारतात कोणत्या तारखेला हा फोन करणार आहे, याविषयी शाओमीने अद्याप अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही.

शाओमी कंपनीचा भारतीय बाजारात दाखल झाल्यापासून मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. इतर कंपनीच्या तुलनेत शाओमी कपंनीचे स्मार्टफोन अधिक स्वस्त असतात. यामुळे शाओमीच्या कंपनीकडे अनेकजण आकर्षित झाले आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शाओमी कंपनीने एमआय 10 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होता. एमआय नोट प्रोची स्मार्टफोनची किंमत भारतात जवळपास 50 हजार ते 55 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शाओमीने 8 जीबी रॅमसह हा स्मार्टफोन स्पेनच्या बाजारात उतरवला होता. त्याची किंमत 649 यूरो म्हणजेच 51 हजार रुपये किंमत होती. स्पेनमध्ये या स्मार्टफोनचा सेल सुद्धा सुरू आहे. तसेच हा स्मार्टफोन ग्राहकांना ग्लेशियक व्हाइट, ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या रंगात मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. हे देखील वाचा- Year Ender 2019: या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले 'Top 5' Apps

महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन अँड्रॉयड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टम वर काम करीत आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 20 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा शॉर्ट टेलिफोटो लेन्स, पाच मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि दोन मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये पेंटा कॅमेराचा सेटअप दिला आहेजबरदस्त सेल्फी काढता यावा यासाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.फोनमध्ये 5 हजार 260 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग फिचर देण्यात आले आहे.