Windows 11 ऑपरेटिंग सिस्टिम भारतात लॉन्च, जाणून घ्या कसे कराल डाउनलोड
Windows11 (Photo Credits-Twitter)

Microsoft ने भारतीय युजर्ससाठी आपले लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम Windows11 हे रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमचे नवे अपडेट सर्वात प्रथम विंडोज 10 युजर्सला मिळणार आहे. त्याचसोबत नव्या लॉन्च होणाऱ्या लॅपटॉप मध्ये विंजोज 11 चा सपोर्ट दिला जाणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, प्री-इंस्टॉल विंडो 11 डिवाइससाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या मते युजर्सला विंडो 11 डाउनलोड अॅन्ड इंस्टॉल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर लायसेन्सच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यानंतर डाउनलोडिंग प्रक्रिया सुरु होणार आहे.(Koo App कडून 'हे' खास फिचर रोलआउट, मायबोलीत ट्रान्सलेट करता येणार)

मायक्रोसॉफ्टचे नवे विंडोज11 ऑपरेटिंग सिस्टिम नव्या युजर इंटरफेस सोबत येणार आहे. यामध्ये ब्रँन्ड न्यू विंडोज स्टोर, सेंटर टास्कबार आणि स्टार्ट मेन्यू बटण दिले गेले आहे. याच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नव्या डिझाइनसह कॅलेंडर, वेदर आणि स्पोर्ट्स लीडरबोर्ड सारखे विजेट मिळणार आहे. या व्यतिरिक्त सिस्टिम ट्रे, नोटिफिकेशन आणि क्विक अॅक्शन युआयला सुद्धा सुधारले होते. कंपनीने दावा केला की, नव्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या माध्यमातून युजर्सला वेगाने आपले काम करता येणार आहे.

जर तुमचा कंप्युटर विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करत असेल तर तुम्हाला प्रमथ पीसी हेल्थ चेक अॅपच्या माध्यमातून तुम्ही तपासून पाहू शकता की, नवे अपडेट तुम्हाला सपोर्ट करणार आहे की नाही. या व्यतिरिक्त विंडोज अपडेट सेटिंगमध्ये जाऊन सुद्धा तपासून पहाता येईल. यासाठी सेटिंग्स>अपडेट अॅन्ड सिक्युरिटी>विंडोज अपडेट येथे जात Check For Update वर क्लिक करा.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने ऑफिस 2021 आणि मायक्रोसॉफ्ट 365 सुद्धा रोलआउट केले ाहे. मायक्रोसॉफ्ट 365 चे डिझाइन शानदार आहे. यामध्ये OpenDocument Format 1.3 दिले गेले आहे. तर दुसऱ्या बाजूला Office 2021 मध्ये Word, Excel,Power Point, OneNote आणि Teams चे सपोर्ट मिळणार आहे.