WhatsApp सुरू करणार Facebook सारखे फिचर, यूजर्स प्रोफाईलमध्ये टाकू शकतील Cover Photo, वाचा सविस्तर
WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन अपडेट्स आणते. ज्याद्वारे अनेक नवीन फीचर्सची सुविधा युजर्सना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळीही कंपनी एका खास फीचरवर काम करत आहे, हे जाणून युजर्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅपचे आगामी फीचर फेसबुकच्या फीचरसारखेच असणार आहे.

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप एक नवीन फेसबुक सारखी कव्हर इमेज जोडण्याची योजना आखत आहे, असे webteinfo च्या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आगामी काळात युजर्स फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सअॅपवर त्यांच्या प्रोफाईलमध्ये कव्हर फोटो टाकू शकतील. webteinfo ने सांगितले की, "जेव्हा हे वैशिष्ट्य बीटा परीक्षकांसाठी सक्षम केले जाईल, तेव्हा तुमच्या बिजनेस प्रोफाइल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील," (वाचा - Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

दरम्यान, Webteinfo ने आगामी फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, WhatsApp वापरकर्त्याच्या बिजनेस सेटिंग्जमध्ये कॅमेरा बटण सादर करण्याचा विचार करत आहे. यामध्ये यूजर फोटो निवडू शकतात किंवा कव्हर फोटो म्हणून नवीन प्रोफाइल पिक्चर वापरू शकतात.

संपर्क सूचीतील दुसरा वापरकर्ता तुमच्या बिजनेस प्रोफाइलला भेट देईल तेव्हा, तो प्रोफाइल फोटो आणि स्टेटससह तुमचा नवीन सेट केलेला कव्हर फोटो पाहण्यास सक्षम असेल. WhatsApp बिजनेस खात्यांसाठी कव्हर फोटो सेट करण्याची क्षमता विकसित होत आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप भविष्यातील अपडेट्समध्ये 'कम्युनिटी' वैशिष्ट्य आणण्याच्या दिशेनेही काम करत आहे. कम्युनिटी ही एक खाजगी जागा आहे, जिथे व्हॉट्सअॅपवरील विशिष्ट ग्रुप एडमिन्स अधिक नियंत्रण असते. अहवालात असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप कम्युनिटी हे ग्रुप चॅटसारखे आहे. ग्रुप एडमिन कम्युनिटीतील इतर ग्रुप्सशी लिंक करू शकतात.