VLC Media Player Banned: भारतामध्ये व्हीएलसी मीडीया प्लेअर वर बॅन; वेबसाईट, डाऊनलोड लिंक देखील ब्लॉक
VLC Media Player | Pixabay.com

भारतामध्ये VideoLAN project ने बनवलेला लोकप्रिय मीडीया प्लेअर सॉफ्टवेअर आणि स्ट्रिमिंग मीडीया सर्व्हर VLC media player यावर बंदी घालण्यात आली आहे. MediaNama रिपोर्ट्सनुसार, VLC Media Player वर 2 महिन्यांपासून भारतात बंदी घालण्यात आली आहे. जर तुमच्याकडे हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केलेले असेल तर ते काम करणार आहे. कंपनीकडून किंवा भारत सरकार कडून अद्याप या बंदीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, VLC Media Player वर बंदी मागील कारणांमध्ये त्याचा वापर चीनी हॅकिंग ग्रुप Cicada ने सायबर अटॅक साठी केला असल्याचेही सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी सिक्युरिटी एक्सपर्ट्सना मिळालेल्या माहितीनुसार VLC Media Player चा वापर करून लांब टप्प्याच्या सायबर अटॅक कॅम्पेन द्वारा मालव्हेअर टाकले जात आहेत.

भारत सरकार किंवा कंपनीने याबाबत कोणतीही मोठी घोषणा न करण्यामागील कारण हा सॉफ्ट बॅन असल्याचेही सांगितले जात आहे. ट्वीटर वर युजर्स कडून या बॅन बाबतची चर्चा केली जात आहे.

भारतामध्ये सध्या VLC Media Player website आणि डाऊनलोड लिंक बॅन केली आहे. त्यामुळे आता कुणी नव्याने व्हीएलसी मीडीया प्लेअरचा वापर करू शकत नाही.

2020 मध्ये भारत सरकारने चीनी अ‍ॅप्सवर देशात बंदी जाहीर केली आहे. यामध्ये PUBG Mobile, TikTok, Camscanner सह अन्य अ‍ॅप्सचा समावेश आहे. PUBG Mobile चं इंडियन व्हर्जेन BGMIदेखील भारतामध्ये बॅन आहे. Google Play store,Apple App store वरून त्याला हटवण्यात आले आहे. या बॅनमागे भारतीय युजर्सचा डाटा चीन मध्ये जाण्याची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. VLC Media Player चीनी कंपनीचं नाही. हे सॉफ्टवेअर बनवलेली VideoLAN ही कंपनी पॅरीसची आहे.