Vivo 51 (Photo Credits-Twitter)

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी विवो (Vivo) ने त्यांचा लेटेस्ट हँडसेट Vivo Y51 (2020) इंडोनेशिया मध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त या डिवाइसमध्ये snapdragon 665 प्रोसेसर मिळणार आहे. विवो वाय51 (2020) च्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल येथे अधिक जाणून घ्या.(Moto G 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

विवो वाय51 (2020) स्मार्टफोनची किंमत 3,599,000IDR (जवळजवळ 18,749रुपये) आहे. हा स्मार्टफोन Titanium Sapphire आणि crystel Symphoney कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, विवो वाय51 (2020) लवकरच भारतात लॉन्च केला जाणार असून याची किंमत 29 हजार रुपयांपर्यंक असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 2408X1080 पिक्सल आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 128G स्टोरेज दिला आहे. जो मायक्रोएसडीच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. या व्यतिरिक्त यासाठी साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.(Oppo A33: खुशखबर! ओपो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन 'ओपो ए 33' च्या किंमतीत मोठी घट)

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 48MP प्रायमरी सेंसर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा Tertiary सेंसर दिला आहे. फोनच्या फ्रंटला 16MP च्या सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त हँडसेटमध्ये 4G VoLTE, वायफाय, जीपीएस, ब्लुटूथ ओटीजी, ग्लोनेस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. याचे वजन 188 ग्रॅम आहे.