Oppo A33 smartphone (Photo Credits: Oppo)

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपोने आपला स्मार्टफोन ओपो ए 33 (Oppo A33) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने जवळपास एक महिन्याआधी आपला बजेट स्मार्टफोन ओपो ए 33 भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या पेजवरून या फोनच्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप, 5000 एमएएच बॅटरी आणि 18 डब्ल्यू वेगवान चार्जिंगचा समावेश आहे.

ओपो ए 33 स्मार्टफोनमध्ये पंच होल डिझाइनसह 6.5 इंचाचा एचडी + (720x1600 पिक्सल रिझोल्यूशन) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला रीफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 5 हजार एमएएच बॅटरी क्षमता आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा- Jio, Airtel आणि Vodafone-idea चे 'हे' आहेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान; पहा संपूर्ण लिस्ट

ओपो ए 33 हा स्मार्टफोन केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक हजार रुपयांच्या कपातीनंतर आता या स्मार्टफोनची किंमत 10,990 रुपयांवर गेली आहे. भारतात हा स्मार्टफोन 11,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. मिंट क्रीम आणि मूनलाइट ब्लॅक या दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर नवीन किंमत अद्ययावत करण्यात आली असली तरी कंपनीने किंमतीत कपात करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

लॉकडाऊनमुळे अनेक स्मार्टफोन कंपन्यांना नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. या नुकसानीची खपली काढून टाकण्यासाठी बऱ्याच कंपन्या स्मार्टफोन चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखताना दिसत आहे. तसेच स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा पाया भक्कम करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहेत.