Moto G 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Moto G 5G (Photo Credits: Twitter)

Moto G 5G स्मार्टफोन भारतात अखेर लॉन्च झाला आहे. सध्या हा फोन केवळ फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेट आणि 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देखील आहे. यात होल पंच डिझाइनसह 6.7-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे. Moto G 5G फोन या महिन्याच्या सुरुवातीला युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि आता तो भारतीय बाजारातही उपलब्ध झाला आहे. OnePlus Nord नंतर हा भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन आहे.

Moto G 5G किंमत आणि सेल ऑफर्स:

Moto G 5G भारतात 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मेमरीचा पर्याय देण्यात आली आहे. मात्र सध्या भारतात हा फोन 4000 रुपयांच्या सूट सह 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा फोन सध्या तुम्ही केवळ फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता. लॉन्च ऑफरमध्ये एसबीआय आणि एक्सिस कार्डवर 5% कॅशबॅक मिळत आहे. HDFC बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याद्वारे तुम्ही 19,999 रुपयांना हा फोन खरेदी करु शकता. Moto G 5G हा फोन व्हॉल्वॅनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स:

Moto G 5G फोन अॅनरॉईड 10 वर कार्यरत आहे. यात 6.7 इंचाचा फुल-एचडी +(1,080x2,400 पिक्सल) LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 394 पीपीआय आहे. याशिवाय हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असून एसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही हे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा f/2.2 अपर्चर आणि 118 डिग्री फिल्ड ऑफ व्यू असलेला 8 मेगापिक्सल चा सेकेंडरी वाईल्ड एंगल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G 5G मध्ये  5,000 एमएएच ची बॅटरी 20 वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग सह दिली आहे. फोनची बॅटरी दोन दिवसांपर्यंत उतरणार नाही. याशिवाय फोनमध्ये रिअर माऊंडेट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये 5 जी, एनएससी, ब्लुयुथ 5.1,  Wi-Fi 802.11ac, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस इत्यादी सोय देण्यात आली आहे. मोटो जी  5जी फोन डस्ट रसिस्टेंट साठी IP52 सर्टिफाईड आहे. 166x76x10mm डायमेन्शनसह 212 ग्रॅम इतके त्याचे वजन आहे.