स्मार्टफोन निर्माती कंपनी विवो यांनी Y सीरिजचा नवा स्मार्टफोन Vivo Y20A भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात उतरवण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास Vivo Y20A मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. या व्यतिरिक्त या डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ही मिळणार आहे.(Xiaomi Mi1 10i भारतात Amazon India वर सेलसाठी होणार उपलब्ध, 5 जानेवारीला होणार लॉन्च)
कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि अॅन्ड्रॉइड 11 वर आधारित FunTouch OS11 वर काम करणार आहे. तसेच 6.51 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. या व्यतिरिक्त युजर्सला या डिवाइसमध्ये Snapdragon 439 सह 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. याचा इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडीच्या मदतीने वाढवता येणार आहे.
विवोने फोटोग्राफीसाठी Vivo Y20A स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये पहिला 13MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 2MP चा बोके लेन्स आणि तिसरा 2MP मॅक्रो लेन्स मिळणार आहे. तर फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.(World's Best-Selling 5G Device: तमाम कंपन्यांना मागे टाकून Apple चा iPhone 12 ठरला जगातील सर्वाधिक विकला जाणारा 5G डिव्हाइस)
Vivo Y20A स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची जंम्बो बॅटरी मिळणार आहे. जी 10W फास्ट चार्जिंग लेस आहे. त्याचसोबत हेडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 4.1, मायक्रो युएसबी पोर्ट आणि जीपीएस सारखे फिचर्स दिले गेल आहेत.या स्मार्टफोनची किंमत 11,490 रुपये आहे. या किंमतीत 3GB रॅम + 64GB स्टोरेज दिला जाणार आहे. तसेच Nebula ब्लू आणि Down व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. विवो वाय20 ए ची विक्री येत्या 2 जानेवारी 2021 पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरु होणार आहे.