Xiaomi Mi1 10i भारतात Amazon India वर सेलसाठी होणार उपलब्ध, 5 जानेवारीला होणार लॉन्च
Xiaomi (photo Credit: IANS/Representative Image)

शाओमीने (Xiaomi) नुकताच त्यांचा आगामी स्मार्टफोन Xiaomi Mi1 10i भारतात येत्या 5 जानेवारीला लॉन्च करण्यात असल्याची घोषणा केली होती. तर स्मार्टफोनसह युजर्सला खास फिचर्स अंतर्गत 108MP कॅमेरा ही दिला जाणार आहे. त्यानंतर आता स्मार्टफोनच्या उपलब्धतेबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता भारतात शाओमी कंपनीचा हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तर अॅमेझॉनवर याचा एक टीझर ही झळकवण्यात आला आहे. त्यात फक्त 108 मेगापिक्सल कॅमेरा असे लिहिले आहे. त्याचसोबत Notify लिंक ही दिली आहे.(Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स सेल 26 डिसेंबरपासून सुरू; iPhone आणि Realme च्या स्मार्टफोनवर मिळणार 10 हजार रुपयांची सूट)

कंपनीने शाओमीच्या या स्मार्टफोन बद्दल अद्याप फिचर्स, कलर आणि किंमती बद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र लिंक्सच्या माध्यमातून याचे स्टोरेज आणि कलर वेरियंटचा खुलासा झाला आहे. लिक्स्टर इंद्रानी चक्रब्रती यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये माहिती दिली होती की, Mi10 भारतात दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध होणारआहे. या वेरियंटमध्ये 6G रॅमसह 128GB स्टोरेज दिला जाणार आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये मिडनाइट ब्लॅक, पॅसिफिक सनराईज आमि एटलांटिक ब्लू रंगात मिळणार आहे.(Vivo V20 (2021) स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

Mi10 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर लैस आहे. अॅन्ड्रॉइड 11Os वर आधारित असू शकतो. याचा स्टोरेज मायक्रो एसडीच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4820mAh ची बॅटरी मिळू शकतो. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. याचा प्रायमरी सेंसर 108MP असणार आहे. यामध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.