Vivo Smartphone (Photo Credit-Twitter)

चायनीज स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपले दोन नवे स्मार्टफोन्स Vivo X27 आणि Vivo X27 Pro बाजारात लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X27 मधील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि Vivo X27 Pro कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे. या दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे.

जाणून घ्या Vivo X27 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X27 हा एक डुअल सिम स्मार्टफोन आहे. याचे दोन वेरिएंट आहेत. हा अॅनरॉईड 9.0 Pie वर काम करतो. यात 9 इंचाचा फुल एचडी (HD) डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्युशन 1080x2340 पिक्सल आणि ऑस्पेक्ट रेशो 19.5:9 इतका आहे. यात हेक्सा कोर क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 710 SoC चा वापर करण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅमसह दोन वेरिएंट देण्यात आले आहेत- 128 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबी इंटरनल मेमरी. चीनी मार्केटमध्ये वीवो एक्स27 ची किंमत 3,198 चीनी युआन म्हणजेच 32,900 रुपये आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे. प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल आहे. यात 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल चा दोन कॅमेरे दिले आहेत. तसंच 16 पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून यात 256 जीबी वेरिएंटमध्ये फ्लॅश चार्जिंग देण्यात आलं आहे.

जाणून घ्या Vivo X27 Pro चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा ऑस्पेक्ट रेशो 20.5:9 इतका आहे. हा फोन ऑक्टो-कोर स्नॅपड्रॅगनचा 710 SoC प्रोसेसरवर काम करेल. यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आहे. यात प्रायमरी रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सल आहे. यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo X27 Pro मध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आले असून या वेरिएंटची किंमत 3,998 चीनी युआन म्हणजे सुमारे 41,000 रुपये आहे.