Vivo V17 स्मार्टफोन आज भारतात लाँच; पाहा 'किती' आहे किंमत
Vivo Smartphone (Photo Credit-Twitter)

चीनची स्मार्टफोन कंपनी 'विवो'ने भारतात आज आपला Vivo V17 स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोने सर्वात अगोदर रशियामध्ये हा फोन लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने Vivo V17 Pro आणि S1 हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. विवोने नव्याने लाँच केलेल्या Vivo V17 स्मार्टफोनमध्ये चांगल्या दर्जाचे प्रोसेसर, कॅमेरा आणि डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. आज दुपारी 12 च्या नंतर अधिकृतरित्या Vivo V17 लाँच करण्यात आला. दरम्यान, यात किंमत आणि फोनचे खास वैशिष्ट्ये समजले आहेत.

भारतात Vivo V17 या स्मार्टफोनची किंमत 22 हजार 990 रुपये आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 6.38 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझोल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. तसेच या फोनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर दिला आहे. (हेही वाचा - Alert: SBI चे जुने डेबिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बंद होणार; नवीन कार्ड मिळवण्यासाठी 'असा' कसा अर्ज)

या फोनमध्ये क्वॉड कॅमेराचा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी 4 हजार 500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ग्राहकांना Vivo V17 हा स्मार्टफोन 17 डिसेंबरपर्यंत 22 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.