विवो कंपनीचा Sub Brand iQoo लवकरच भारतात iQoo स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आता पर्यंत या स्मार्टफोन बाबतची माहिती आणि टीझर लीक झाले होते. नुकताच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबासाईट फ्लिपकार्टवर झळकवण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांना फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार हे नक्की. कंपनीने आता या स्मार्टफोनबाबत अधिकृत खुलासा करत 25 फेब्रुवारीला याचे लॉन्चिंग होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा स्मार्टफोन चीनच्या मार्केट मध्ये सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
iQOO India च्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर फोनच्या लॉन्चिंगची तारिख बाबत खुलासा केला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 25 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच कंपनीने फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ग्राहकांना खऱेदीसाठी उपलब्ध असल्याची ही घोषणा केली आहे. फोन 5G कनेक्टिव्हिटीसोबत लॉन्च करण्यात येणार असून Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसरवर काम करणार आहे.(ग्राहकांसाठी व्होडाफोन लॉन्च करणार सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 39 रुपयांपासून होणार सुरुवात)
Tweet:
A Quest marks the start of a new future. The ultimate victory in life.#iQuestOnAndOn Launching on 25th Feb @Flipkart pic.twitter.com/v5MJRpdpEJ
— iQOO India (@IqooInd) February 14, 2020
आता पर्यंत लीक झालेल्या माहितीनुसार, iQoo मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. तर 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर ही असणार आहे. युजर्सला UFS 3.1 स्टोरेज मिळणा आहे. पंच-होल डिस्प्ले डिझाइन देण्यात येणार असून सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे. फोन 6.44 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले सोबत येणार आहे.
तर काही दिवसांपूर्वीच चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo S1 Pro भारतात लाँच केला आहे. नववर्षाच्या सुरुवातीला भारतातील ग्राहकांसाठी विवो कंपनीने हे खास गिफ्ट आणले आहे. या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे आकर्षक म्हणजे यात 48MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आजपासून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत 19,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन विवोच्या अधिकृत साइटवर तसेच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही तुम्ही खरेदी करु शकता.