UPI (Photo Credits: AIR/ Twitter)

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंटमध्ये 45 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. व्यवहारांचे मूल्य 35 टक्क्यांहून अधिक वाढले, एकूण 20.64 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले आहेत. (हेही वाचा - Intel Lay Off: इंटेलमध्ये होणार मोठ्या प्रमाणात नोकर कपात; तब्बल 15,000 लोकांना कामावरून काढून टाकले जाणार)

हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा एकूण व्यवहार 20 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. जून 2024 मध्ये, एकूण UPI व्यवहार मूल्य 20.07 ट्रिलियन रुपये होते, तर मे मध्ये ते 20.44 ट्रिलियन रुपये होते. NPCI डेटाने असेही दर्शवले आहे की जुलै 2024 मध्ये UPI द्वारे सरासरी दैनंदिन व्यवहाराचे मूल्य 466 दशलक्ष रुपये किंवा सुमारे 66,590 कोटी रुपये होते. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये UPI व्यवहारांचे प्रमाण 3.95 टक्क्यांनी वाढले, तर व्यवहारांचे मूल्य 2.84 टक्क्यांनी वाढलेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (2024-25), UPI ने अंदाजे 55.66 अब्ज व्यवहारांमध्ये 80.79 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार नोंदवले गेले आहेत.

पाहा पोस्ट -

2023-24 मध्ये, एकूण UPI व्यवहार 131 अब्ज होते, जे 2022-23 मध्ये 84 अब्ज होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मासिक बुलेटिनने नोंदवले आहे की, गेल्या चार वर्षांत UPI व्यवहारांमध्ये दहा पटीने वाढ झाली आहे, 2019-20 मधील 12.5 अब्ज व्यवहारांवरून 2023-24 मध्ये 131 अब्ज व्यवहार झाले आहेत. एकूण डिजिटल पेमेंट व्हॉल्यूमपैकी 80 टक्के वाटा आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांचे आहेत, FY24 मध्ये वार्षिक 57 टक्क्यांनी वाढ झाली. 2023-24 साठी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) बँकिंग सेक्टर राउंडअपनुसार, या विभागामध्ये, PhonePe आणि Google Pay चे वर्चस्व आहे, त्यांचा एकत्रित बाजार हिस्सा 86 टक्के आहे..