एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटरची (Twitter) सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीत रोजच खळबळ उडत आहे. कंपनीची कमान हाती घेताच मस्कने जवळपास 3800 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कने आता कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. ट्विटरमध्ये सुमारे 5500 कंत्राटी कर्मचारी असून त्यापैकी सुमारे 4400 कर्मचाऱ्यांना नोटीस न देता काढून टाकण्यात आले आहे.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन सेवा आणि ईमेलचा लाभ दिला जात नाही. कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांनाही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कमी करण्यात येणार असल्याची माहिती नव्हती. हे कंत्राटी कर्मचारी कामावर येऊ न लागल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे समोर आले. ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या माहितीचा सामना करणार्या संघांमध्ये आणखी कपात करत आहेत.
ट्विटर आणि इतर मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वेषयुक्त भाषण नियंत्रित करण्यासाठी आणि हानिकारक कंटेंटविरूद्ध नियम लागू करण्यासाठी आउटसोर्स केलेल्या कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. ट्विटरने आता अशा कंटेंटवर नजर ठेवणाऱ्या लोकांना एक्झिट दाखवण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी 4 नोव्हेंबर रोजी ट्विटरने आपल्या कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हकालपट्टीबद्दल माहिती देणारा ई-मेल पाठवला होता. (हेही वाचा: Elon Musk's Shocking Order: एलॉन मस्कचा धक्कादायक आदेश ऐकून मॅनेजरला झाली उलटी; जाणून घ्या सविस्तर)
आता मस्क यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरच्या अंतर्गत प्रणालींमधील प्रवेश गमावल्यानंतर, काही लोकांना कळले की ते आता ट्विटरसोबत काम करत नाहीत. मस्क किंवा ट्विटर यांनी या आठवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या या कर्मचारी कपातीवर अद्याप भाष्य केलेले नाही. ट्विटरचे जगभरात सुमारे 7,500 कर्मचारी होते, त्यापैकी सुमारे 3,800 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. भारतात कंपनीने 90 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे.