सध्या जगभरामध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप वापरलं जातं. आबालवृद्धांनाअया व्हॉट्सअॅपच्या मदतीने जगभरात आपल्या प्रियजणांसोबत कनेक्टेट राहता येतं. मात्र काही समाजकंटक सध्या नागरिकांची व्हॉट्सअॅप अकाऊंटस हॅक (WhatsApp Hacking) करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याबाबत ठाणे पोलिस (Thane Police) आयुक्तालयाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत. नगारिकांनी त्यांची व्हॉट्सअॅप अकाऊंट्स सुरक्षित ठेवण्याचंही आवाहन केले आहे. त्यासाठी सेटिंग्समध्ये बदल करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, परिचित व्यक्तीच्या डीपी किंवा नाव साधर्म्यामुळे व्हॉट्सअॅप अकाऊंटद्वारा मेसेज पाठवून व्हेरिफिकेशन कोड, ओटीपी पाठवला जातो. आणि त्यावरूनच अकाऊंट हॅक केली जातात. हॅक केलेल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटद्वारा फोटो, व्हिडिओ आणि इतर माहितीचा गैरवापर केला जातो. WhatsApp 'Disappearing Messages' feature लॉन्च; 7 दिवसांनी आपोआप मेसेज गायब करणारं हे फीचर वापरायचं कसं?
ठाणे पोलिस आयुक्तालय ट्वीट
!! व्हाट्सअँप हॅक होतेय ! सावधान !! pic.twitter.com/OcMapujhme
— Thane City Police (@ThaneCityPolice) November 18, 2020
व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होण्यापासून रोखण्यासाठी काय कराल?
व्हॉट्समध्ये तुमचे प्रायव्हसी सेटिंग्स सुरक्षित ठेवा. तसेच सेटिंग्स मध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय ऑन ठेवा. तसेच ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीने देखील मेसेजद्वारा ओटीपी किंवा व्हेरिफिकेशन कोड मागितला तर थेट देऊ नका. त्याची वैयक्तितरित्या खात्री करून घ्या.
सध्या व्हॉट्सअॅप मध्ये दिवसागणिक नव नवीन फीचर्स आणि अपडेट्स नव्याने जोडली जात आहेत. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप केवळ मेसेजिंग नव्हे तर आर्थिक व्यवहारांसाठी, व्यवसायासाठीदेखील जगभर प्रभावीपणे वापरले जाते.