WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप या जगभर लोकप्रिय असणार्‍या मेसेजिंग अ‍ॅपने काल (5 नोव्हेंबर) "Disappearing Messages' feature लॉन्च केले आहे. या फीचर बाबत मागील काही दिवस बरीच चर्चा सुरू होती. अखेर हे फीचर रोल आऊट झाल्याने मेसेजचे टाईम लिमिट आता 7 दिवस राहणार आहे. सात दिवसांनंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आपोआपच डिलिट देखील होणार आहे. 'डिसअपिअरिंग फीचर हे वैयक्तिक आणि ग्रुप चॅटस साठी देखील लागू असेल. ग्रुपमध्ये हे डिसअपिअरिंग मेसेजेस पर्याय सुरू करण्याचा अधिकार अ‍ॅडमिनकडे असेल. आता WhatsApp च्या माध्यमातून Transfer करू शकाल पैसे; NPCI ने दिली परवानगी.

दरम्यान चॅटिंग अत्यंत शांतपणे आणि खाजगीत व्हावं, आपण कशाबद्दल मागे बोलत होतो याचा विसर पडून नवी सुरूवात करता यावी यासाठी हे नवं फीचर मदत करेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान फेसबूकच्या मालकीचं व्हॉट्सअ‍ॅप वापरताना आता हे व्हॉट्स वेब ते अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस युजर्सना नेमकं 'Disappearing Messages'कसं वापरता येईल हे नक्की जाणून घ्या.

'Disappearing Messages'हा पर्याय सुरू कसा करायचा?

व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा.

contact’s name वर टॅप करा.

Disappearing messages वर टॅप करा.

त्यानंतर तुम्हांला CONTINUE चा पर्याय दिसेल.

सिलेक्ट ऑन चा पर्याय निवडा.

'Disappearing Messages'हा पर्याय बंद कसा करायचा?

व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा.

contact’s name वर टॅप करा.

Disappearing messages वर टॅप करा.

त्यानंतर तुम्हांला CONTINUE चा पर्याय दिसेल.

सिलेक्ट ऑफ चा पर्याय निवडा.

'Disappearing Messages'चा पर्याय हा टेक्स्ट मेसेज सोबतच व्हिडिओ आणि फोटोजसाठी देखील लागू असणार आहे. त्यामुळे तुम्हांला आपोआप 7 दिवसांनंतर मेसेज डिलीट करणं हा पर्याय अगदी विचारपूर्वक निवडावा लागणार आहे. मेसेज हा दोन्ही म्हणजे पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्याकडून डिलीट होईल. फोटोजसाठी तुम्ही ऑटो डाऊनलोडचा पर्याय ऑन ठेवला असेल तर फोटोज स्टोअर होऊ शकतात. जर 7 दिवस तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप उघडलंच नसेल तर आपोआपच मेसेज न वाचताच डिलीट झालेला असेल पण तुम्हांला त्याचं नोटीफिकेशन पाहता येईल.