Tecno Spark 7 भारतात लाँच, जाणून घ्या 6000mAh इतकी दमदार बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत
Techno Spark 7 (Photo Credits: Twitter)

टेक्नो स्पार्कने आपला नवा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला आहे. Techno Spark 7 हा स्मार्टफोन आज स्मार्टफोन आज Amazon India या ऑनलाईन शॉपिंग साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा पहिला फ्लॅशसेल येत्या 16 एप्रिलला दुपारी 12 वाजता होणार आहे. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन पोको, रियलमी, शाओमी सारख्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देणार आहे.

या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये इतकी आहे. यात दोन पर्याय देण्यात आले आहेत. एक 2GB+32GB स्टोरेज आणि 3GB+64GB स्टोरेज देण्यात आले आहे. याच्या हाय एंड वेरियंटची किंमत 8,499 रुपये इतकी आहे. पहिल्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी केल्यास यावर 500 रुपयाचा डिस्काउंट मिळत आहे.हेदेखील वाचा- Gudi Padwa & Ugadi 2021 Discounts on Mobiles: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोबाईल किंमतीवर 31 हजारांपर्यंतची सूट; Apple, RoG 3, Realme 7 अशा अनेक फोन्सचा समावेश 

Techno Spark 7 डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.52 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या 2GB रॅम वेरियंटमध्ये मिडियाटेक हेलिओ A20 प्रोसेसर मिळतो. तर 3GB रॅममध्ये मिडियाटेक हेलिओ A25 प्रोसेसर दिला आहे. Tecno Spark 7 Android 11 Go ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित HiOS वर काम करतो.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ड्युल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 16MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगससाठी यात 8MP चा कॅमेरा दिला आहे.

Tecno Spark 7 मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो. या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, यात 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटुथ 5.0, ड्युल 4G सिम कार्ट सपोर्ट, Wi-Fi सारखे फिचर्स दिले आहेत. त्याचबरोबर रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.