Gudi Padwa & Ugadi 2021 Discounts on Mobiles: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोबाईल किंमतीवर 31 हजारांपर्यंतची सूट; Apple, RoG 3, Realme 7 अशा अनेक फोन्सचा समावेश 
Photo Credit: Flipkart

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जाते. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते.या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत प्रत्येकाने आपल्या दारात उभारल्या होत्या.त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे असे पुराणातील कथा आहे.या दिवशी बरेच जण घरात छोटी का असेल पण सोन्याची वस्तु किंवा घरात एखादी नवीन गोष्ट घेतात. बरेच जण स्वतःसाठी ही काही वस्तू या दिवशी घेण्याचा प्रयत्न करतात.जर तुम्ही ही यंदाच्या गुढी पाडव्याच्या दिवशी स्वतःसाठी किंवा आपल्या खास व्यक्ती साठी मोबाईल घेण्याच्या विचारात आहात. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.गुढी पाडव्याच्या सणानिमित्त तुम्हाला मोबाईल वर जवळजवळ 31 हजारांपर्यंत सूट मिळू शकते.पाहूयात कोणत्या मोबाईल आहे किती सूट. (Instagram वर Followers वाढवण्यासाठी आजमावा 'या' सोप्या ट्रिक्स; कमी दिवसांत मिळवाल लाखो फॉलोअर्स )

अॅपल आय फोन 

आयफोन 11 64GB आता फ्लिपकार्टवर 46,999 रुपयांवर उपलब्ध आहे. तसेच फोन विकट घेणाऱ्या ग्राहकाला Axis Bank credit cards असल्यास 16,500 च्या वर   5% कैशबैक ही मिळणार आहे.आयफोन 11 मिनी 128GB 63,900 ला मिळणार असून त्यावर ही HDFC क्रेडिट कार्ड असल्यास 6,000 डिस्काउंट मिळणार आहे.आयफोन 12 प्रो 128GB ही फ्लिपकार्ड वर 1,12,900 उपलब्ध आहे.

Asus RoG 3 

Asus RoG फोन 3 12GB व्हेरिएंट आता 45,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.आणि 8 GB 41,999 ला उपलब्ध आहे.अन्य ऑफर्समध्ये फ्लिपकार्ट AXIS बँक क्रेडिट कार्डवरील 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक, एक्सचेंज डील व इतर 16,500 रुपयांपर्यंतचा समावेश आहे.याचा गेमिंग फोन 6.59-इंच एफएचडी + डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी, 64MP triple rear कॅमेरा सह आहे.

पोको M3 

फ्लिपकार्ट वर पोको 6 GB+ 128GB 11,999 आणि 6GB + 64GB 10,999 ला उपलब्ध आहे. फ्लिपकरवरही खरेदीदारांना क्रेडिट कार्डवर 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक मिळेल.Google Nest Hub वर निवडक टीव्ही ,लॅपटॉप, एसी, मोबाइल वर No cost EMI ₹1,834/महीना , standard EMIपर्याय उपलब्ध आहेत .एक्सचेंजद्वारे ₹ 10,350 पर्यंतची सूट ही आहे.