Instagram वर Followers वाढवण्यासाठी आजमावा 'या' सोप्या ट्रिक्स; कमी दिवसांत मिळवाल लाखो फॉलोअर्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)

फेसबुकच्या मालकीचे सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम (Instagram) सध्या नेटकऱ्यांच्या हातातला ताईत बनले आहे. केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रीगर यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये या अॅपची निर्मिती केली होती. तेव्हापासून हे अॅप अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या इन्स्टाग्राम वापरणा यूजर्संची संख्या काही कोटींमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर नवनवीन व्हिडिओ पोस्ट करून यूजर्स प्रसिद्धी मिळवत आहेत. तसेच कलाकार मंडळी तर इन्स्टाग्रामवर जाहिराती पोस्ट करून लाखो रुपये कमवत आहेत.

इंस्टाग्राम हे केवळ करमणुकीचे साधन नाही. कारण, असे बरेच लोक आहेत, जे याद्वारे त्यांचे व्यवसाय आणि उत्पादनांची जाहिरात करतात. तुम्हालाही स्वतःच्या व्यवसाय किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर इन्स्टाग्राम आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्रामवर अधिका-अधिक फॉलोअर्स असणं आवश्यक आहे. चला तर मग आज या खास लेखातून इन्स्टाग्रावर जास्तीत-जास्त फॉलोअर्स कसे वाढवायचे यासंदर्भातील सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात...WhatsApp, Facebook and Instagram Down: व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन; कंपनी सांगितलं 'हे' कारण)

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या सोप्या ट्रिक्स -

आपले इंस्टाग्राम खाते Optimize करा -

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कसे मिळवायचे हे ठरविण्यापूर्वी, आपल्या खात्यास पूर्णपणे ऑप्टिमाइझ करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आपल्या खात्यातील “homepage” वरील बायो आकर्षक रित्या अपडेट करा. इन्स्टाग्रामवर जास्तीत- जास्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी प्रोफाईलवर आपला फोटो, वापरकर्त्याचे नाव, बायो आदी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा बायो हा इन्स्टाग्रावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी एक प्रकारचा पाया आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर आकर्षक गोष्टी लिहण्यास विसरू नका. म्हणजे जर तुमचा ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल असेल तर त्याची लिंक येथे अपडेट करायला विसरू नका. या लिंकच्या साहाय्याने एखादी व्यक्ती तुमच्या ब्लॉक आणि यूट्यूब चॅनेललादेखील भेट देऊ शकते.

Trending आणि Viral विषयावर पोस्ट करा -

सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल किंवा ट्रेंड होत असते. आपण त्या व्हायरल विषयाशी संबंधित पोस्ट आपल्या खात्यावर पोस्ट करू शकता. यामुळे आपल्या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. असे केल्याचे आपल्या फॉलोअर्समध्ये वाढ होते. जेव्हा आपण व्हायरल विषयावर पोस्ट करता, तेव्हा त्यावेळी तो विषय ट्रेंडिंग असतो आणि लाखो लोक इन्स्टाग्राममध्ये त्या विषयांचा शोध घेतात. यामुळे, आपल्या पोस्ट्स कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचण्याची ही चांगली संधी असते. फॉलोअर्स वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा जेव्हा आपण व्हायरल विषयावर पोस्ट करता, तेव्हा त्या व्हायरल शब्दांना पोस्टमध्ये #हॅशटॅग करा.

Post मध्ये #Hastag चा वापर करा -

जेव्हा आपण इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करता तेव्हा त्या पोस्टशी संबंधित #हॅशटॅग नक्कीच वापरा. कारण जेव्हा आपण आपल्या एका पोस्टमध्ये हॅशटॅग वापरता, तेव्हा आपली पोस्ट अधिक आकर्षक बनवते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती इन्स्टाग्राममध्ये त्या हस्टागचा शोध घेते, तेव्हा त्याला आपली पोस्ट दिसते. कदाचित तुमची पोस्ट त्या व्यक्तीला आवडली तर तो तुम्हाला फॉलो करू शकतो.

इन्स्टाग्रामवर तुम्ही Advance पोस्ट शेड्यूल करू शकता -

फॉलोअर्संची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही इन्स्टाग्रामवर Advance पोस्ट शेड्यूल करू शकता. यामुळे यूजर्स ज्यावेळी एखादी पोस्ट सर्च करतील, तेव्हा त्यांनी तुमची पोस्ट सर्वात अगोदर दिसेल. आपण सण किंवा उत्सवाच्या वेळी अशा पोस्ट Advance मध्ये शेड्यूल करू शकता. तुम्ही 'क्रोडफायर' नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट शेड्यूल करूँ ठेऊ शकता.

केवळ स्थानिक लोकांनाचं फॉलो करा -

इन्स्टाग्रामवर केवळ स्थानिक व्यक्तींना फॉलो करा. कारण, जेव्हा तुम्ही अभिनेता, दिग्दर्शक, गायक, राजकारणी यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींना फॉलो करता तेव्हा ते लोक तुम्हाला फॉलो करत नाहीत. परंतु आपण एखाद्या स्थानिक व्यक्तीला फॉलो केले तर ती व्यक्ती तुम्हाला फॉलो करण्याची शक्यता असते.

Instagram Account ला Facebook Acount ला लिंक करा -

आपण आपले इंस्टाग्राम खाते फेसबुकशी जोडलेच पाहिजे. त्यामुळे तुमच्या फेसबुकवर असलेल्या सर्व मित्रांना तुम्ही इंस्टाग्रामवर असल्याचं समजतं. यामुळे फेसबुकवरील मित्रदेखील तुम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतील.