Tata Sky युजर्ससाठी धमाकेदार ऑफर, 2 महिने पाहता येणार फ्री TV
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

DTH युजर्साठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पॉप्युलर डीटीएच कंपनी टाटा स्काय (Tata Sky) त्यांच्या युजर्सासाठी दोन महिन्यांसाठी फ्री मध्ये टीव्ही पाहण्याची ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, लॉन्ग टर्म प्लॅन घेतल्यास दोन महिने फ्री टीव्ही ग्राहकांना पाहता येणार आहे. ही ऑफर सर्व युजर्स अॅक्टिव्हेट करु सकतात. मात्र यासाठी कंपनीने काही नियम सुद्धा लागू केले आहेत. तर कंपनीने कोणत्या नियमांचे पालन करावे लागणार आहे ते जाणून घ्या. टाटा स्काय दोन महिन्यांसाठी फ्री मध्ये टीव्ही पाहण्याची संधी ग्राहकांना देत आहे. ही सर्विस घेण्यासाठी ग्राहकांना 12 महिन्यांचा रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्ज झाल्यानंतर दोन दिवसांनी कंपनी युजर्सच्या खात्यात एका महिन्याचे कॅशबॅक आणि सात दिवसांसाठी दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅख क्रेडिट करणार आहे. ही ऑफर 30 जून 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने या ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्सला सिटी बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन टाटा स्कायच्या अकाउंटचे रिजार्च करण्यास सांगितले आहे.

युजर्सला कंपनीच्या या ऑफर बाबत सहज कळणार आहे. ज्या युजर्सला 12 महिन्यांच्या रिचार्ज बद्दल माहिती नाही त्यांनी कमी पैशांचा रिचार्जची किंमत टाकून तेथे तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे. एखादा युजर्सला 200 रुपयांचे रिचार्ज करायचे असल्यास तेथे तुम्हाला अन्य रिचार्ज बाबत ही सांगितले जाणार आहे. ही ऑफर ग्राहकाला सुरु करायची असल्यास त्यांनी प्रोसीड टू रिचार्ज ऑप्शनवर क्लिक करुन सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरु शकता.(JioMart ने व्हॉट्सअ‍ॅपवर सुरु केली Online Shopping ची चाचणी; नवी मुंबई, ठाणे व कल्याण येथे सुविधा उपलब्ध, जाणून घ्या कशी द्यावी ऑर्डर)

कंपनी ही ऑफर काही नियमांसह ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. ज्या युजर्सकडे टाटा स्कायच्या लॉन्ग टर्मचे सब्रस्क्रिप्शन आहे त्यांना कंपनीने सिटी बँकेच्या कॅशबॅक ऑफर पासून दूर ठेवले आहे. तसेच कंपनीने असे ही म्हटले आहे की, ही ऑफर फक्त सध्याच्या युजर्ससाठी आहे. टाटा स्काय अकाउंटच्या अॅक्टिव्हेशनच्या तारखेला करण्यात आलेल्या रिचार्जवर ही ऑफर देण्यात येणार नाही आहे.