OnePlus 9 series smartphone (PC - PTI)

OnePlus 9 Series Smartphones: वनप्लसने त्याच्या आगामी OnePlus 9 सीरिजवर काम सुरू केले आहे. वनप्लस 9 सीरिज मार्च 2021 च्या आसपास लॉन्च केली जाऊ शकते. आता, वनप्लसच्या पुढील प्रमुख सीरिजच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांसह आणि मॉडेल नंबरशी संबंधित माहिती उघडकीस आली आहे. टेकड्रोइडरने एका ताज्या अहवालात वनप्लस 9 सीरिजशी संबंधित माहितीचा खुलासा केला आहे. लिक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो अनुक्रमे LE2110 आणि LE2117, LE2119, LE2120 नावाने लॉन्च केले जाऊ शकतात.

वनप्लस 9 प्रो तीन प्रकारांमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. मॉडेल क्रमांकाची पहिली दोन अक्षरे 'Lemonade' या कोडनावातून असणार आहेत. काही दिवसांपूर्वी टिपस्टर मॅक्स जेने वनप्लस 9 प्रो साठी हे कोडनेम उघड केले होते.

याव्यतिरिक्त, टेकड्रोइडरने म्हटलं आहे की, कोडनेम LE2127 असणारे एक मिस्टीरियस डिव्हाइस देखील आढळले आहे. पण, ते वनप्लस 9 सीरिजशी संबंधित आहे की, नाही हे अद्याप हे निश्चित झाले नाही. चीनमधील एका वृत्तानुसार, वनप्लस 9 मालिकेत तीन मॉडेल्स लाँच करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार? तर 12 हजारांहून कमी किंमती मधील 'या' दमदार फोनबद्दल जरुर जाणून घ्या)

OnePlus 9 सीरिज स्पेसिफिकेशन्स -

वनप्लस 9 सीरिजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 875 प्रोसेसर, अमोलेड डिस्प्ले, डिस्प्लेवर मध्यभागी पंच-होल दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, वनप्लसच्या पुढील फ्लॅगशिप सीरिजमध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन, आयपी 68 रेटिंग, एनएफसी, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स दिले जाऊ शकतात. अहवालानुसार वनप्लस 9 सीरिजमध्ये 65 वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त 40 वॅटचे वायरलेस चार्जिंग देखील देण्यात येणार आहे.