Lalbaghcha Raja (Photo Credits: Twitter)

22 जुलै दिवशी श्रीहरिकोटा येथून अवकाशामध्ये झेपावलेलं इस्त्रोचं (ISRO) चांद्रयान 2 (Chandrayaan 2) आज (7सप्टेंबर) चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करणं अपेक्षित होतं. मात्र चांद्रयानातील विक्रम लॅन्डरचा (Vikram Lander) चंद्रापासून 2.1 किमीवरच संपर्क तुटला अन इस्त्रोच्या संशोधकांसह अनेक भारतीय ज्या क्षणाची वाट पाहत ते स्वप्न भंगलं. मात्र इस्त्रोच्या इतिहासातील या अत्यंत कठीण कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सामान्य नागरिकांपासून, सेलिब्रिटी, राजकारणी ते अगदी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही (Lalbaugcha Raja) शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक केले आहे. यावेळेस चंद्र मोहिम पूर्ण झाली नसली तरीही प्रयत्न अभिमानास्पद असल्याची भावना ट्वीटरच्या माध्यमातून अनेकांनी व्यक्त केली आहे. तर यंदा चांद्रयान 2 च्या देखाव्यामध्ये विराजमान झालेला लालबागचा राजा मंडळाकडून आज देखाव्यात एक बदल करत 'ISRO आम्हांला तुमचा गर्व आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असा खास स्क्रोल चालवला जात आहे.

विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरू न शकल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मात्र भारतीयांसह शास्त्रज्ञांच्या उत्साहाचं, प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो कार्यालयाला भेट देत त्यांना धीर दिला आहे. सामान्य भारतीयांनीही ट्वीटरच्या माध्यमातून इस्त्रोचं कौतुक केले आहे. Chandrayaan 2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ISRO च्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक; हार न मानता प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला

लालबागचा राजा मंडळ

Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 6: गर्दी आणि वाहतूक कोंडीत न अडकताही इथे घ्या लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन

आनंद महिंद्रा

चांद्रयान 2 चंद्रावर उतरू शकले नसले तरीही शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षभर अभ्यास सुरू राहणार आहे. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाली असती तर भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरला असता.