Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 6: गर्दी आणि वाहतूक कोंडीत न अडकताही इथे घ्या लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन
लोकमान्य टिळकांनी या उत्वासाची सुरुवात करून घरातील गणपती सार्वजनिक केला. आता फक्त महाराष्ट्रातच नाही देशाच्या विविध कानाकोपऱ्यात हा उत्सवाची धूम पाहायला मिळते. त्यावेळी ज्या काही मंडळांची स्थापना झाली त्यातील महत्वाचे म्हणजे पुण्यातील मानाचे गणपती आणि मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugacha Raja),
2 सप्टेंबर, 2019 रोजी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणरायाचे आगमन झाले आहे. आता एकूण 11 दिवस बाप्पा घरात विराजमान असणार आहेत. आजचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) सहावा दिवस. त्यात आता गणपतीसोबतच गौरीचाही थाट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात करून घरातील गणपती सार्वजनिक केला. आता फक्त महाराष्ट्रातच नाही देशाच्या विविध कानाकोपऱ्यात या उत्सवाची धूम पाहायला मिळते. त्यावेळी ज्या काही मंडळांची स्थापना झाली त्यातील महत्वाचे म्हणजे पुण्यातील मानाचे गणपती आणि मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugacha Raja),
लालबागचा राजा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या दर्शनासाठी लोक कित्येक तास रांगेत उभे असतात. विविध क्षेत्रातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. आज ज्यांना या गणपतीचे साक्षात दर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी आम्ही आम्ही खास लालबागच्या राजाची लाईव्ह आरती आणि लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देत आहोत. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. यामुळेही दिवसरात्र भक्तांची रीघ इथे लागलेली असते. यंदा गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे दर्शन 24x7 सुरु राहणार आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: बॉलीवूडमध्ये गणेशोत्सवाची धूम, सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन (Photos)
इथे घेऊ शकता लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन -
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ. या मंडळाची स्थापना सन 1928 साली झाली. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणपतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीचे देखावेही अतिशय नयनरम्य असतात. यावर्षी नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘चांद्रयान 2’चा आगळावेगळा देखावा उभा केला आहे. हे पाहून बाप्पा जणू अंतराळात असल्याचा भास निर्माण होतो. अशा या लालबागच्या राजाचे तुम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घेऊ शकता. यासाठी लालबागचा राजा मंडळाने यूट्यूब, त्यांची अधिकृत वेबसाईट, फेसबूक, ट्विटर अकाऊंट यांच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन, मंडपातील आरती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2019 05:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

