विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी: भारतातील अंतराळ युगाच्या शिल्पकाराला  Google Doodle द्वारे सलाम
Vikram Sarabhai Google Doodle | (Photo Credit: Google)

Vikram Sarabhai Google Doodle: भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांना जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलने ( Google) डूडल (Doodle) बनवून सलाम केला आहे. यंदाचे वर्ष हे विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 या दिवशी झाला होता. आज (12 ऑगस्ट 2019) त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत गूगलने त्यांचे डूडल बनवले आहे. गूगल जगभरातील अशा लोकांचे डूडल बनवते. ज्यांनी समाजासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे.

अहमदाबाद येथील एका कपडा व्यापाऱ्याच्या घरात विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. त्यांचे घर तसे सुखवस्तू होते. त्यामुळे त्यांचे बालपण आनंदात गेले. इतके की, त्यांचे शिक्षणही त्यांच्या कुटुंबीयांनी चालवलेल्या एका प्रयगोशील शाळेत गेले. ज्या शाळेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. साराभाई वयाच्या 18 व्या वर्षी कैंब्रिज येथे शिक्षणासाठी गेले. साराभाई यांच्या कौटुंबीक मित्र असलेल्या रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांची शिफारस केली होती.

विक्रम साराभाई एक अशा निवडक वैज्ञानिकांपैकी एक नाव आहे, जे आपल्या तरुण सहकाऱ्यांना सदैव प्रोत्साहन देत असत. त्यांच्या या प्रोत्साहनाबद्दल सांगितले जाते की, ते एक यशस्वी लीडरही होते. साराभाई यांनी 1947 मध्ये अहमदाबाद येथे भौतिक अनुसंधान प्रयोगशाला (Physical Research Laboratory) या संस्थेची स्थापना केली. (हेही वाचा, अपोलो 11 अंतराळ मोहिम: मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याला 50 वर्षे पूर्ण, गुगल ने बनवले खास डूडल)

साराभाई यांचे वडील एक उद्योगपती होते. तसेच, Physical Research Laboratory या संस्थेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतही केली होती. साराभाई यांना वयाच्या 28 व्या वर्षी पीआरएलशी जोडले गेले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी पीआरएलला त्यांनी जागतीक दर्जा मिळवून दिला. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ मोहिमेचे जणक म्हणूनही ओळखले जातात. त्यांना 1962 मध्ये शांती स्वरुप भटनागर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 30 डिसेंबर 1971 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.