अपोलो 11 अंतराळ मोहिम: मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याला 50 वर्षे पूर्ण, गुगल ने बनवले खास डूडल
Apollo Mission 11 Google Doodle (Photo Credits: Google)

50th Anniversary Of The Moon Landing: 16 जुलै 1969 मध्ये लाँच झालेल्या अमेरिकी 'मिशन अपोलो 11' ला 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आज गुगल ने विशेष असे डूडल (Google Doodle) बनवले आहे. या डूडलमध्ये एक अंतराळवीर चंद्रावर (Moon) उतरताना दाखवला आहे. हे डूडल इतके आकर्षक आणि खास आहे की, यावर क्लिक करतानाच एक व्हिडिओच्या माध्यमातून 50 वर्षापूर्वी या दिवशी झालेला या यानाचा संपुर्ण घटनाक्रम तुम्हाला येथे पाहता येईल. अपोलो 11 अंतराळ मोहिम ही एक अशी ऐतिहासिक मोहिम होती, ज्यात माणसाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.

मिशन अपोलो 11 हे 2 माणसांना चंद्रावर सुरक्षित पोहोचवणे आणि पुन्हा पृथ्वीवर आणणे या संदर्भात होते. हे यान 16 जुलै 1969 रोजी कॅनेडी स्पेस सेंटर लाँच कॉम्प्लेक्स 39A सकाळी 8:32 मिनिटांनी लाँच झाले होते. या यानाच्या यशस्वी उड्डाणासाठी अंतराळवीर माइक कॉलिन्स (Mike Collins) याची नेमणूक करण्यात आली होती. हा अंतराळवीर इतिहासात पहिल्यांदाच नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) आणि बझ आल्ड्रिन (Buzz Aldrin) यांना चंद्रावर घेऊन गेला. या गुगल डूडलवर क्लिक केल्यावर माइक कॉलिन्स एका व्हिडिओच्या माध्यमातून या ऐतिहासिक प्रवास साक्ष देत आहे. पाहा व्हिडिओ

50 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही अदभूत असे यशस्वी उड्डाण केले तेव्हा आम्हा तिघांच्या खांद्यावर संपुर्ण जगाचे ओझे आहे असे वाटत होते, असे माइक कॉलिन्स या व्हिडिओ मध्ये सांगत आहे.

24 जुलै 1969 रोजी माइक कॉलिन्स, नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन पृथ्वीवर परतले. तेव्हा संपुर्ण जगासाठी तसेच आमच्यासाठी अभिमानाची बाब होते असेही माइक म्हणाले.