चांद्रयान 2 (Chandrayaan 2) या ऐतिहासिक मोहिमेकडे अवघ्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तर आज ISRO कडून एका ट्वीटच्या माध्यमातून चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने (Orbiter) विक्रम लॅन्डर (Vikram Lander) याचा शोध घेतला आहे. मात्र अद्याप विक्रम लॅन्डर याच्यासोबत संपर्क झालेला नाही. त्यामुळे विक्रम लॅन्डरसाठी संपर्क करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी असे म्हटले आहे की, चांद्रयान 2 मधील विक्रम लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित असून त्याला कोणताही धक्का बसलेला नाही. मात्र हार्ड लॅन्डिंग झाल्याने विक्रम लॅन्डर झुकला आहे. त्यामुळे त्याच्यासोबत संपर्क करण्यासाठी प्रत्येकरितीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या चांद्रयान 2 मिशन संबंधित एका अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यामधून पाठवण्यात आलेल्या फोटोनुसार निश्चित स्थळापासून जवळच हार्ड लॅन्डिंग झाले आहे. लॅन्डर तेथे सुरक्षित असून फक्त थोडासा झुकला आहे. तसेच इस्रोच्या टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (आयएसटीआरएसी) साठी एक टीम कार्यरत आहे.(Chandryaan 2: नागपूर पोलिसांची विक्रम लॅन्डर कडे विनवणी, सिग्नल तोडण्यासाठी चलान घेणार नाही म्हणत केले हटके ट्विट)
#VikramLander has been located by the orbiter of #Chandrayaan2, but no communication with it yet.
All possible efforts are being made to establish communication with lander.#ISRO
— ISRO (@isro) September 10, 2019
विक्रम लॅन्डरने शनिवारी सॉफ्ट लॅन्डिंग करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु शेवटच्या क्षणाला त्याचा इस्रोसोबतचा संपर्क तुटला. तसेच चंद्राच्या पृष्ठभागापासून लॅन्डर 2.1 किमी उंचावर होता. लॅन्डरच्या आतमध्ये 'प्रज्ञान' नावाचे रोवर सुद्धा आहे.