भारताची महत्वकांक्षी अंतराळ मोहीम चांद्रयान 2 (Chandrayaan 2) ही अगदी शेवटच्या टप्प्यात यशस्वी होताहोता ऐन वेळी सिग्नल तुटल्याने अर्धवट राहिली. यांनतर इस्रोच्या वैज्ञानिकांसोबतच कोट्यवधी भारतीयांची सुद्धा निराशा झाली. अवघ्या 2.1 किमीवर चंद्रयांतील विक्रम लँडरशी (Vikram Lander) संपर्क तुटल्याने आतापर्यंतचे अथक परिश्रम आणि उत्सुकता पाण्यात गेल्याची भावना सर्वत्र पाहायला मिळत होती. पण इतक्यात, आज म्हणजेच सोमवारी 9 सप्टेंबर रोजी इस्रोतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरचे नेमके ठिकाण पुन्हा शोधण्यास यश आले आहे, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा विक्रमशी संपर्क करण्यासाठी वैज्ञानिकांना मदत झाल्याचे समजत आहे. साहजिकच यांनतर भारतीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या, अशातच नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) देखील आपल्या हटके शैलीत विक्रम लॅण्डर ला एक अनोखी विनवणी केली आहे. विक्रम लँडरला संबोधून नागपूर पोलिसांनी एक खास ट्विट केले, यामध्ये त्यांनी लँडरला पुन्हा संपर्कात येण्यासाठी विनंती केली आहे, विक्रम तू सिग्नल तोडलास म्हणून तुझ्याकडून चलान घेणार नाही पण तू परत ये अशा आशयाचे हे ट्विट आहे.
नागपूर पोलीस ट्विट
Dear Vikram,
Please respond 🙏🏻.
We are not going to challan you for breaking the signals!#VikramLanderFound#ISROSpotsVikram @isro#NagpurPolice
— Nagpur City Police (@NagpurPolice) September 9, 2019
हे हटके आणि क्रिएटिव्ह ट्विट पाहताच नेटकऱ्यांमध्ये सुद्धा एकाप्रकारचा हशा पिकला. काहींनी आपल्या शैलीत या भावनेचे कौतुक केले तर काहींनी पोलिसांना टोला लगावला.
पहा काय म्हणतायत नेटकरी
Hats off to whosoever who has tweeted this on behalf of Nagpur Police. A gem this is
— Col Rana (R) (@J_Rana7) September 9, 2019
If Vikram will respond you can send me the Challan for Breaking Signals I will Pay on behalf of Vikram .
Waiting to Hear from You #vikaramlander Please Respond 🙏#ISROSpotsVikram
— Sunil Gandhi (@Sunpreity) September 9, 2019
Nagpur Police!!
Yes, indeed , Hopes of 133 crore Indians attached to #Vikram . It's truly an exception!
And YOUR tweet is EXCEPTIONAL!
— Mallika Kaleem (@MallikaKaleem) September 9, 2019
Because of this fear he may not be responding#Jokes part# Come on Vikram pls respond we all r waiting for your response from bottom of heart . Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Somnath R Bichewar (@somnathbichewar) September 9, 2019
दरम्यान, इस्रोच्या माहितीनुसार, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सापडला आहे, सुदैवाने पृष्ठभागावर आदळूनही लँडर सुरक्षित मात्र थोड्या तिरक्या स्थितीत आहे. विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्यास चांद्रयान 2 मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी होईल हे नक्की!