Lunar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Penumbral Lunar Eclipse June 2020 Date:  जून महिन्यात यंदा वटपौर्णिमेदिवशी म्हणजेच 5 आणि 6 जून दरम्यान चंद्रग्रहण आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) आहे. सन 2020 मधील हे दुसरं चंद्रग्रहण भारताप्रमाणेच युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका या प्रांतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे भारतामध्ये दिसणार्‍या या चंद्रग्रहणाची तारीख, वेळ जाणून घ्या आणि घरच्या घरी या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा. दरम्यान 5 जूनचं चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) आहे. म्हणजे ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते, त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण म्हणतात. यंदा वटपौर्णिमे पाठोपाठ पुढील महिन्यात गुरू पौर्णिमेदिवशी देखील चंद्रगहण दिसणार आहे.

भारतामध्ये जून महिन्यातील चंद्रग्रहण 2020 ची तारीख आणि वेळ

timeanddate.com च्या माहितीनुसार, भारतामध्ये 5 जून दिवशी रात्री 11.15 वाजल्यापासून चंद्रग्रहण सुरू होईल ते 6 जूनला 12.54 पर्यंत असेल. तर हे छायाकल्प चंद्रग्रहण रात्री 2.34 वाजता संपणार आहे. दरम्यान या चंद्रग्रहणाचा पूर्ण कालावधी 3 तास 18 मिनिटं इतका असेल. दरम्यान चंद्रग्रहणाच्या सुमारे 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. सुतक काळ हा हिंदू धार्मिक मान्यतांप्रमाणे अशुभ असतो. ग्रहण संपलं की सुतक देखील संपते. मात्र 5 जूनचं चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असल्याने त्यामध्ये सुतककाळ नाही.  (Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!)

घरातूनच चंद्रग्रहण पाहणार असाल तर तुम्हांला चंद्र अगदीच फिकट दिसू शकेल. या छायाकल्प चंद्रग्रहणामध्ये 57% चंद्र हा पृथ्वीच्या सावलीत असेल. त्यामुळेच त्याचे दर्शन स्पष्ट होणं थोडं कठीण असतं. तुम्हांला ऑनलाईन हे छायाकल्प चंद्रग्रहण पहायचं असेल तर ते Slooh किंवा Virtual Telescope

च्या युट्युब चॅनलवर देखील पाहता येऊ शकतं. तेथे चंद्रग्रहणाच्या स्थितीचं लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवले जाते.

भारतीय समाजात आज 21 व्या शतकामध्येही ग्रहण या भौगोलिय घटनेबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र तुम्ही खगोलप्रेमी असाल तर हे सारे समज गैरसमज दूर सारून तुम्हांला या घटनेचा आनंद घेता येऊ शकतो. केवळ आरोग्याच्या दृष्टीने थेट उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणं चूकीचं आणि डोळ्यांसाठी अपायकारक असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन तुम्ही नक्किच चंद्रग्रहण बघू शकता.